advertisement

Mulshi Winning Candidate List: मुळशीकरांचा पॅटर्नच वेगळा, कुणाला दिला कौल? वाचा तिन्ही गटांच्या विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

मुळशीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काटे की टक्कर झाल्याची चर्चा आहे

News18
News18
पुणे :  मुळशी तालुक्यात 63.93 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काटे की टक्कर झाल्याची चर्चा आहे. मतदानाच्या दिवशी धरणग्रस्त भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक, पदाधिकारी ही मतदारांना बाहेर काढत मतदान घडवून आणत होते.तर, धरणाच्या खालील भागात राष्ट्रवादीची घड्याळ चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे या हाय होल्टेज लढतीचा निकालाची उत्सुकता लागली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक प्रचाराचा नूर एकदम पालटून गेला होता. मोठ्या प्रचारसभेपेक्षा उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर दिसत होता. मात्र, जसजसा प्रचार पुढे सरकाला तशी ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत असल्याचे दिसून आले. मुळशीत जिल्हा परिषदेच्या तीन गटात आणि सहा गणात निवडणूक लढणार आहे.
advertisement

जिल्हा परिषद तीन गट

  • पौड
  • हिंजवडी
  • पिरंगुट

पुण्यात जिल्हा परिषदांचे काय आहे चित्र?

हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १३ गट आणि पंचायत समितीचे २६ गण होणार आहेत. तसेच जुन्नरमध्ये सात गट (१४ गण), आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण), शिरूरमध्ये सात गट (१४ गण), खेडमध्ये सात गट (१४ गण), मावळमध्ये पाच गट (१० गण), मुळशीत तीन गट (सहा गण), दौंडमध्ये सहा गट (१२ गण), पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण), वेल्हा दोन गट (४ गण), भोर ३ गट (६ गण), बारामतीमध्ये सहा गट (१२ गण) व इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण असणार आहेत.
advertisement
तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे अनेक ठिकाणी फरक अत्यल्प असून निकाल शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतमोजणी केंद्र परिसरात समर्थकांची गर्दी वाढली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Mulshi Winning Candidate List: मुळशीकरांचा पॅटर्नच वेगळा, कुणाला दिला कौल? वाचा तिन्ही गटांच्या विजयी उमेदवारांची यादी
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement