advertisement

'मी नर्व्हस आहे', रिटायरमेन्टनंतर अरिजीत सिंह पहिल्यांदाच स्टेजवर; आवाज ऐकताच चाहत्यांच्या डोळ्यात पाणी, VIDEO

Last Updated:

रिटायरमेन्टनंतर अरिजीत सिंह पहिल्यांदाच समोर आला. अरिजीत स्टेजवर पाऊल ठेवताच इमोशनल झाला. अरिजीतच्या परफॉर्म्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

News18
News18
बॉलिवूडचा लाडका गायक अरिजीत सिंहने काही दिवसांआधीच त्याच्या प्लेबॅक सिंगिंगचा राजीनामा दिला. त्याच्या रिटायरमेन्टच्या घोषणेनंतर सगळेच शॉक झाले. अरिजीतची नवी गाणी आता ऐकायला मिळणार नाही यामुळे चाहते खूप इमोशनल झाले होते. दरम्यान रिटायमेन्टची घोषणा केल्याच्या तब्बल 12 दिवसांनी अरिजीत सिंह स्टेजवर दिसला. फक्त दिसला नाही तर त्याने गाणंही गायलं. अरिजीतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कोलकात्यातील अनुष्का शंकरच्या म्युझिकल शोदरम्यान अरिजित सिंग दिसला. रिटायरमेन्टची घोषणा केल्यानंतर अरिजीत पहिल्यांदाच स्टेजवर दिसला. पाहुणा कलाकार म्हणून त्याला आमंत्रित केलं होतं. तो स्टेजवर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टेजवर पोहोचताच अरिजित हसला आणि म्हणाला, "मी खूप नर्व्हस आहे. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद"
advertisement
रविवारी रात्री कोलकाता येथे झालेल्या म्युझिकल शोमध्ये अरिजीत सिंगनं कमबॅक केलं. नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सितारवादक अनुष्का शंकरसोबत त्याने परफॉर्म केलं. स्टेडियममध्ये झालेल्या अनुष्का शंकरच्या 'चॅप्टर टूर 2026' मध्ये तो गेस्ट कलाकार म्हणून सहभागी झाला होता
अनुष्का शंकरसोबत या शोमध्ये तबला वादक बिक्रम घोष आणि अरिजीत सिंग यांनी लक्ष्मी शंकर यांनी गायलेली आणि दिग्गज सितार वादक पंडित रवि शंकर यांनी संगीतबद्ध केलेली 'माया भोरा रती' ही बंगाली रचना सादर केली. शास्त्रीय आणि समकालीन संगीताच्या या मिश्रणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर अरिजीत आणि अनुष्का यांनी 'ट्रेसेस ऑफ यू' चे लव्ह साँग गायलं. 20 मिनिटांच्या या परफॉर्मन्समध्ये प्रेक्षकांनी दोघांनाही सर्वोत्तम प्रतिसाद दिला. दोघांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.
advertisement
advertisement
परफॉर्मन्सनंतर अरिजीतनं असंही असंही सांगितलं की, तो अलीकडेच अनुष्काच्या घरी गेला होता. जिथे त्यांनी एका नवीन गाण्यासाठी मदत केली. अरिजीतचा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका चाहत्याने लिहिले, 'मी आनंदी आणि दु:खी आहे.' दुसऱ्यानं लिहिलंय, 'असं वाटतंय की मी तुला वर्षानुवर्षे जिवंत ऐकत आहे.' आणखी एकानं लिहिलं. 'अरे, अरिजीत! मला तुझा आवाज आठवतो आणि माझ्या अंगावर काटा येतो.'
advertisement
27 जानेवारी रोजी अरिजीत सिंगनं त्याच्या रिटायरमेन्टची घोषणा केली. हा निर्णय अचानक घेतला गेला नाही तर बराच विचार केल्यानंतर घेण्यात आला आहे, असंही त्याने स्पष्ट केलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी नर्व्हस आहे', रिटायरमेन्टनंतर अरिजीत सिंह पहिल्यांदाच स्टेजवर; आवाज ऐकताच चाहत्यांच्या डोळ्यात पाणी, VIDEO
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement