तासगाव जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : तासगावमधील विजयी उमेदवारांची यादी, पाहा पाटलांच्या बालेकिल्ल्यात कुणी मारली बाजी?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sangli Tasgoan ZP election result 2026 : तासगावमधील मनेराजुरी, विसापूर आणि चिंचणी यांसारख्या मोठ्या गटांकडे सर्वांच्या नजरा आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.
Sangli Tasgoan ZP election result 2026 : तासगाव तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं. या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण आहेत. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज, म्हणजे 9 फेब्रुवारीला होणाऱ्या निकालांकडे लागलं होतं. या निवडणुकीत प्रामुख्याने आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या गटात मोठी चुरस पाहायला मिळाली.
या निवडणुकीत तासगावमधील मनेराजुरी, विसापूर आणि चिंचणी यांसारख्या मोठ्या गटांकडे सर्वांच्या नजरा आहेत. काही दिवसांपूर्वी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून बलगवडे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. या सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांचा निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचं होतं. अशातच निकाल समोर येत आहेत.
advertisement
आजच्या मतमोजणीनंतर तासगाव तालुक्याच्या मिनी मंत्रालयाची चावी कोणाकडे जाणार, याचा फैसला होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. ही निवडणूक केवळ स्थानिक नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 10:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
तासगाव जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : तासगावमधील विजयी उमेदवारांची यादी, पाहा पाटलांच्या बालेकिल्ल्यात कुणी मारली बाजी?










