advertisement

3 वेगळे भाग, 3 फ्लॅट अन् 3 चोऱ्या; पण सगळीकडे चूक एकसारखीच! पुण्यात नेमकं काय घडलं ?

Last Updated:

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कोंढवा, मुंढवा आणि चंदननगर या तीन वेगवेगळ्या भागात घरफोडीच्या मोठ्या घटना समोर आल्या आहेत

पुण्यात चोरीच्या घटना (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यात चोरीच्या घटना (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कोंढवा, मुंढवा आणि चंदननगर या तीन वेगवेगळ्या भागात घरफोडीच्या मोठ्या घटना समोर आल्या आहेत. या तीनही ठिकाणी चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल ५१ लाख रुपयांचा ऐवज लांबवला. विशेष म्हणजे, या सर्व घटनांमध्ये घराच्या सुरक्षेबाबतची एक 'सारखीच चूक' दिसून येत असल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
भरदिवसा कुलूपबंद घरांवर 'नजर'
चोरट्यांनी मुख्यत्वे अशा घरांना लक्ष्य केले जेथे भरदिवसा कुलूप होते. गोकुळनगर, काकडे वस्ती आणि मुंढवा या तीनही ठिकाणी घराचे कुलूप तोडून कपाटातील ऐवजावर हात साफ करण्यात आला. त्यामुळे आता घराला कुलूप लावून बाहेर पडताना पुणेकरांनी घरातील मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवणं अतिशय गरेजचं आहे.
गोकुळनगर (कात्रज-कोंढवा रस्ता) येथील एका सोसायटीत चोरट्यांनी २ फेब्रुवारी रोजी भरदिवसा डल्ला मारला. कपाटातील साडेचार लाखांची रोकड आणि दागिने असा एकूण २४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. येवलेवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंढवा (श्री गजानन महाराज सोसायटी) येथेही चोरट्यांनी तोच कित्ता गिरवला. कपाटातील २ लाख १५ हजारांची रोकड आणि दागिने असा एकूण २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. कोंढव्यातील काकडे वस्ती येथे शनिवारी (दि. ७) भरदिवसा एका फ्लॅटचे कुलूप तोडून ८७ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लांबवला.
advertisement
पुणेकरांची 'ती' एक चूक कोणती?
या सर्व चोऱ्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे घराचे केवळ साधे कुलूप. चोरट्यांनी 'रेकी' करून ही घरं हेरली होती. भरदिवसा लोक कामावर गेल्याची खात्री पटताच, कपाटात मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने ठेवल्याचा अंदाज चोरट्यांना लागला. मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये न ठेवता घरातच ठेवण्याची चूक घरमालकांना महागात पडली आहे.
advertisement
सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि सचिन थोरात या प्रकरणांचा सखोल तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
3 वेगळे भाग, 3 फ्लॅट अन् 3 चोऱ्या; पण सगळीकडे चूक एकसारखीच! पुण्यात नेमकं काय घडलं ?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement