advertisement

Sagar Mohalkar: 'इलाका तेरा...' निलेश घायवळच्या कानाखाली मारणाऱ्या सागर मोहोळकरला पुण्यात हलवलं, पोलीस अलर्ट

Last Updated:

एका कुस्ती स्पर्धेदरम्यान पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळला गर्दीत कानशिलात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सागरचे नाव गुन्हेगारी वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.

News18
News18
पुणे : पुण्याचा कुख्यात डॉन निलेश घायवळच्या टोळीची आजही शहरामध्ये दहशत आहे. खंडणी, मारहाण आणि खून प्रकरणांमध्ये घायावळवर अनेक गुन्हे दाखल आहे. मध्यंतरी घायवळ टोळीच्या पुणे पोलिसांनी चांगली मस्ती उतरवली होती. पण, मागील वर्षी घायवळ टोळीचा आका निलेश घायवळच्या कुस्तीच्या मैदानात पैलवान सागर मोहोळकर याने कानाशिलात लगावली होती. निलेश घायवळच्या कानाशिलात लगावल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला. पण, आता सागरवर अहिल्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली. आता त्याला उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं आहे. पुणे हा घायवळचा एरिया असल्यामुळे पोलिसांनी कडक सुरक्षा पुरवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  गुंड आणि पैलवान सागर मोहोळकर याच्यावर  अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात बुधवारी अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होताा. या प्राणघातक हल्ल्यात मोहोळकर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी अहिल्यानगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं.  सागर हा काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी राात्री तो जामखेड परिसरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या. यापैकी चार गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण, सहा गोळ्या लागल्यानंतरही तो शुद्धीवर होता.
advertisement
घटनास्थळावरच तोंडामध्ये घुसलेल्या गोळीच्या पुंगळ्या त्याने थुंकल्या होत्या. बेशुद्ध अवस्थेत त्याला तातडीने  उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात सागरवर उपचार होणार आहे.
2 जण दिसले CCTV कॅमेऱ्यात
जामखेडच्या नुरानी कॉलनी या ठिकाणी सागर मोहोळकर यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पाच पथकं तयार केली आहे. दुचाकीवरून आलेला आरोपींनी हा हल्ला केला असल्याचं पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं आहे. अद्याप या हल्ल्याचं कारण स्पष्ट झालेलं नसून सागर मोहोळकर यांच्या विरोधात पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहिले असता दुचाकीवरून दोन मारेकरी आले होते, असं दिसतं आहे,  पोलीस या दृष्टीने तपास करत आहे.
advertisement
कोण आहे सागर मोहोळकर? 
सागर मोहोळकर हा मूळचा नान्नज गावचा रहिवासी असून त्याचे वडील किसन मोहोळकर हे पेंटर आहेत. वडिलांची इच्छा आणि स्वतःच्या आवडीपोटी सागर आणि त्याचा भाऊ सचिन या दोघांनीही कुस्ती क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. स्थानिक वाद आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कामुळे सागर हळूहळू गुन्हेगारीकडे वळला. एका कुस्ती स्पर्धेदरम्यान पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळला गर्दीत कानशिलात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सागरचे नाव गुन्हेगारी वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्याच्यावर सध्या खून, मारामारी आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Sagar Mohalkar: 'इलाका तेरा...' निलेश घायवळच्या कानाखाली मारणाऱ्या सागर मोहोळकरला पुण्यात हलवलं, पोलीस अलर्ट
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement