टेलिव्हिजनची सोज्वळ सून, हातात सिगारेट अन् ललित प्रभाकरसोबत बोल्ड अंदाज, 2.38 सेकंद तर Unexpected, VIDEO व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी टीव्हीची सोज्वळ सून न राहता तिच्या बोल्डनेसनं तिनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिचा नवा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी टेलिव्हिजनवर सोज्वळ सुनेचा किताब मिळवलेल्या अनेक अभिनेत्री आता मराठी सिनेमातही नशीब आजमवताना दिसत आहेत. छोट्या पडद्यानंतर आता मोठ्या पडद्यावरही त्यांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. टेलिव्हिजनची अशीच एक सोज्वळ सून जिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेताच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता ती सोज्वळ सून न राहता तिच्या बोल्डनेसनं तिनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिचा नवा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'सुपर डुपर' असं नव्या सिनेमाचं नाव असून या सिनेमातील गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यात अभिनेत्रीचा ललित प्रभाकरबरोबर बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. हे एक पार्टी साँग असून अभिनेत्री ललित प्रभाकरबरोबर डान्स करताना दिसतेय. गाण्यात 2 मिनिटं 38 सेकांदाची डान्स मुव्ह पाहून सगळेच अवाक् झालेत.
advertisement
यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मनोरंजनाची मेजवानी ठरणारा 'सुपर डुपर' हा कौटुंबिक सिनेमा 3 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीझरनंतर आता 'सुट्टा रोल' हा धमाकेदार पार्टी ट्रॅक रिलीज झालं आहे. या गाण्याला रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि अभिनय जगताप यांचा जबरदस्त आवाज आहे. हाय-एनर्जी म्युझिक, दमदार बीट्स, क्लब वाईब आणि आकर्षक शूटींगमुळे हे गाणं हिट ठरेल यात शंका नाही.
advertisement
या गाण्यात ललित प्रभाकरसोबत अभिनेत्री विदुला चौघुलेचा स्टायलिश, ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. ललितचा कूल, कॉन्फिडंट लूक आणि विदुलाचा बोल्ड, अट्रॅक्टिव्ह अवतार यामुळे स्क्रीनवर वेगळीच ऊर्जा जाणवते. दोघांची केमिस्ट्री आणि बिनधास्त सादरीकरण गाण्याची रंगत दुप्पट करते.
‘सुट्टा रोल’मधील त्यांचा अंदाज पाहाता, ललित साकारत असलेला बेधडक, मस्तीखोर आणि हटके स्वभावाचा तरुण तर विदुला साकारत असलेली आत्मविश्वासू, स्टायलिश आणि स्वतःच्या अटींवर जगणारी मुलगी अशी झलक यातून स्पष्ट होते. या जोडीची धमाल पुढे काय रंगत आणेल, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
अभिनेत्री विदुला चौघुले हिनं जीव झाला येडापिया या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेत तिनं साकारलेली सोज्वळ सून प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. या मालिकेनंतर विदुला 'सुस्साट', 'बॉइज 3' सारख्या सिनेमात काम केलं आहे. तिचा बॉइज 3 हा सिनेमा चांगलाच हिट झाल होता. त्यात तिचा बोल्डनेस पाहायला मिळाला होता.
advertisement
'सुपर डुपर' मध्ये निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते तसेच मुख्य भूमिकेत ललित प्रभाकर आणि विदुला चौघुले अशी भव्य स्टारकास्ट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 6:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
टेलिव्हिजनची सोज्वळ सून, हातात सिगारेट अन् ललित प्रभाकरसोबत बोल्ड अंदाज, 2.38 सेकंद तर Unexpected, VIDEO व्हायरल







