Numerology: संकष्टी चतुर्थीला कोणाला येणार गोड बातमी! 1 ते 9 मूलांकाचे दैनिक अंकशास्त्र कसं असेल?
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Daily Numerology: शुक्रवार संकष्टी चतुर्थीचा दिवस असून त्या अंकशास्त्र भविष्य काय सांगते, ते आपण सविस्तर पाहुया. आजचा दिवस प्रगती आणि मेहनतीचा आहे, पण त्याचसोबत आरोग्य आणि नात्यांमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले मूलांक 1 ते 9 दैनिक अंकशास्त्र..
अंक 1 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे)
आज तुम्हाला प्रसिद्धी आणि सन्मान मिळेल, पण गर्व डोक्यात जाऊ देऊ नका. हा दिवस तुमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारा ठरू शकतो, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाची धोरणं सुधारण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करून पाहावे लागतील. प्रेमाच्या बाबतीत तुमची 'भाव खाण्याची' पद्धत आज कामाला येईल.
लकी नंबर: 4, लकी कलर: डार्क ब्लू
advertisement
अंक 2 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे)
तुमच्या कामाची दखल घेतली गेल्यामुळे आज तुम्ही समाधानी असाल. दिवसभर काहीतरी खास यश मिळत राहील. मात्र, डोकं दुखण्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त ताण घेऊ नका आणि आराम करा. आज जे काही पैसे मिळतील, त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा थोडी जास्त मेहनत करावी लागेल. साध्या वाटणाऱ्या ओळखीचं रूपांतर एका चांगल्या नात्यात होऊ शकतं.
advertisement
लकी नंबर: 6, लकी कलर: व्हायोलेट
अंक 3 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे)
वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत आज तुम्हाला नक्की मिळेल. लांबून आलेल्या एखाद्या बातमीमुळे आर्थिक फायदा होईल आणि मन प्रसन्न राहील. कामात येणारे अडथळे तुमच्या प्रगतीत थोडी अडचण आणू शकतात. सुरुवातीच्या काही खटक्यांनंतर तुमचं प्रेमप्रकरण आज एकदम स्मूथ चालेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विश्रांती घ्या.
advertisement
लकी नंबर: 11, लकी कलर: लॅव्हेंडर
अंक 4 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे)
आत्मविश्वास आणि सकारात्मकतेमुळे आजचा दिवस उत्साहात जाईल. आज तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांशी तुमचे संपर्क येतील. जुने तणाव संपल्यामुळे आज तुम्ही लय एनर्जेटिक वाटाल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि जुनं देणं फेडायला आजचा काळ उत्तम आहे. जोडीदाराचा आक्रमक स्वभाव आज थोडा मानसिक ताण देऊ शकतो.
advertisement
लकी नंबर: 4, लकी कलर: व्हायोलेट
अंक 5 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे)
तुमच्या बोलण्याने आज नवीन मित्र बनवा. दिवसभराच्या धावपळीमुळे संध्याकाळी थोडा थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. कोणाचीही मदत घेताना सावध राहा, कारण फसवणुकीची शक्यता आहे. वाढत्या खर्चामुळे पैशांची जुळवाजुळव करताना थोडी चिंता वाटेल. तुमचा जोडीदार मात्र आज तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल.
advertisement
लकी नंबर: 6, लकी कलर: रॉयल ब्लू
अंक 6 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे)
भावंडांसोबतचे संबंध आज खूप चांगले राहतील. विनाकारण होणारे वाद आज टाळलेलेच बरे. व्हायरल इन्फेक्शन किंवा फ्ल्यू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. खर्च वाढल्यामुळे तुम्हाला तुमच्या बचतीला हात लावावा लागू शकतो. नात्यात जवळीक वाढवण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होईल.
advertisement
लकी नंबर: 22, लकी कलर: स्काय ब्लू
अंक 7 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, आणि 25 तारखेला झाला आहे)
भावंडांची मदत मिळेल आणि तुमच्या छोट्या प्रयत्नांचे मोठे फायदे आज दिसून येतील. महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात, त्यामुळे हलकं जेवण घ्या. शेअर मार्केट किंवा लॉटरीतून फायदा होण्याचे योग आहेत. जोडीदाराशी झालेल्या भांडणामुळे विनाकारण टेन्शन वाढू शकतं, शांत राहा.
लकी नंबर: 18, लकी कलर: लाल
अंक 8 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे)
ज्या सन्मानाची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट बघत होता, तो आज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल राहील. तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा आज शिखरावर असेल. नोकरीत बढती मिळण्याचे दाट योग आहेत. अनोळखी व्यक्तीला डेटवर भेटण्याचा विचार असेल तर तो आज टाळलेलाच बरा.
लकी नंबर: 7, लकी कलर: लेमन
अंक 9 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे)
सरकारी किंवा स्थानिक प्रशासनाकडे अडकलेली कामं आज हळूहळू मार्गी लागतील. तुमचं व्यक्तिमत्त्व आज इतरांना आकर्षित करेल. तेलकट आणि जास्त कोलेस्ट्रॉल असलेलं जेवण टाळा, फळं आणि भाज्या जास्त खा. आज तुम्ही जे काही प्लॅन्स केले आहेत, त्यात यश मिळेल. मोहात पडून चुकीच्या मार्गाला जाऊ नका, स्वतःवर ताबा ठेवा.
लकी नंबर: 22, लकी कलर: इंडिगो
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 8:01 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: संकष्टी चतुर्थीला कोणाला येणार गोड बातमी! 1 ते 9 मूलांकाचे दैनिक अंकशास्त्र कसं असेल?










