सातारा ते पुणे आता सुसाट! खंबाटकीचा अवघड घाट टाळता येणार, वेळ वाचणार, कसा आहे नवा मार्ग?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Satara Pune Highway: या प्रकल्पाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू होते. सध्या ते सुमारे 90 टक्के पूर्ण झाले आहे.
पुणे: पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
खंबाटकी घाटातील धोकादायक एस (x) आकाराच्या तीव्र वळणांमुळे अपघात आणि प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. यावर तोडगा म्हणून दोन बोगदे बांधण्यात आले आहेत. प्रत्येकी तीन पदरी असलेल्या या बोगद्यांचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू होते आणि सध्या ते सुमारे 90 टक्के पूर्ण झाले आहे. यातील साताऱ्याकडून पुण्याकडे येणारा एक बोगदा शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून दुसरा बोगदा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
कसा आहे नवा मार्ग?
हा नवीन मार्ग एकूण 6.46 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पांतर्गत डाव्या बाजूला 307 मीटर तर उजव्या बाजूला 1,224 मीटर लांबीचा तीन पदरी बोगदा उभारण्यात आला आहे. तसेच डाव्या बाजूला 1,104 मीटर आणि उजव्या बाजूला 930 मीटर लांबीचा वाय (Y) व्हायडक्ट पूल बांधला जात आहे.
advertisement
पुण्याच्या दिशेने बोगदा संपल्यानंतर कॅनॉल दरीपर्यंत जोडणारा पूलही तयार केला जात आहे. सध्या या संपूर्ण कामाचे सुमारे 10 टक्के काम शिल्लक आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सध्या केवळ हलक्या वाहनांसाठीच हा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर खुला करण्यात आला आहे.
45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 7 मिनिटांवर
पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची डाव्या बाजूची लेन सध्या चाचणी तत्त्वावर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या बोगद्यामुळे घाट पार करण्यासाठी लागणारा 45 मिनिटांचा वेळ आता फक्त 7 मिनिटांवर आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा सुमारे 38 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पात 1.3 किलोमीटर लांबीचा बोगदा आणि 1.2 किलोमीटर लांबीचा व्हायाडक्ट तयार करण्यात आला आहे. यामुळे घाटातील वळणावळणाचा अवघड रस्ता टाळून वाहनचालकांना सरळ आणि जलद मार्ग मिळाला आहे.
advertisement
या महामार्गामुळे प्रवाशांच्या वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. पूर्वी खंबाटकी घाटातील अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण जास्त होते. मात्र नव्या बोगद्यामुळे हे अपघात लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 1:07 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सातारा ते पुणे आता सुसाट! खंबाटकीचा अवघड घाट टाळता येणार, वेळ वाचणार, कसा आहे नवा मार्ग?








