Navi Mumbai : उरण ते पनवेल सुसाट प्रवास, 2 महिन्यात पूर्ण होतोय मास्टर प्लॅन, काऊंटडाऊन सुरू...

Last Updated:

Uran Road Update : गव्हाणफाटा-चिरनेर रेल्वे ओव्हरहेड ब्रिजवर गर्डर बसवण्याचे काम सुरू असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

News18
News18
नवी मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावरील रेल्वे ओव्हरहेड ब्रिजचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हा पूल वाहतुकीसाठी लवकर खुला होणार आहे. पूल सुरू झाल्यानंतर दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे पाच हजार प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
'या' महिन्यापासून करता येणार प्रवास
जेएनपीए बंदरातून देशभरात कंटेनर वाहतूक करणाऱ्या रेल्वे मार्गावरील जुना गव्हाण-चिरनेर पूल तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आला होता. त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू झाले असले तरी ते अत्यंत संथ गतीने चालू होते. या पुलावरून पनवेल, मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच उरण पूर्वेकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. पूल बंद झाल्यानंतर वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र हा पुल दोन महिन्यांत सुरु होणार आहे.
advertisement
गव्हाणफाट्यावर वाहनचालकांचा अतिरिक्त फेरा
वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी वाहनचालकांना गव्हाणफाट्यावरून दीड किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. चिरनेरकडून येणाऱ्या वाहनांना पनवेल महामार्गावरील धोकादायक उलट्या दिशेने वळसा घ्यावा लागत आहे. रेल्वे पूल बंद असल्यामुळे जांभूळपाडा, वेश्वी आणि दिघोडे या गावांची एसटी सेवा देखील बंद करण्यात आली होती.
आता पुलाच्या कामाला वेग आल्याने हा पूल लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे हजारो वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा त्रास कायमचा संपणार असून परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : उरण ते पनवेल सुसाट प्रवास, 2 महिन्यात पूर्ण होतोय मास्टर प्लॅन, काऊंटडाऊन सुरू...
Next Article
advertisement
Shiv Sena UBT: विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल', मातोश्रीचे टेन्शन वाढले
विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटात भूकंप! ४ नगरसेवक 'नॉट रिचेबल'; मातोश्रीच
  • सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच ठाकरे गटाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक 'नॉट र

  • गटनेता निवडीच्या बैठकीपूर्वीच हे नाट्य घडले

  • पक्षाने या नगरसेवकांच्या दरवाजावर 'व्हिप'ची नोटीस चिकटवली आहे.

View All
advertisement