Sharad Pawar : दिल्ली 'मॅनेज' करणारा मित्र गमावला! सुरेश कलमाडींच्या निधनानंतर शरद पवारांची भावुक पोस्ट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sharad Pawar On Suresh Kalmadi : मागील वर्षी सुरेश कलमाडी यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. अशातच शरद पवारांनी भावूक पोस्ट केलीये.
Suresh Kalmadi Passed Away : शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी अख्खी दिल्ली मॅनेज करणारा नेता म्हणून सुरेश कलमाडी यांना ओळखलं जात होतं. पण हे स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण झालं नाही. आज सुरेश कलमाडी यांचं पुण्यात निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. मागील वर्षी सुरेश कलमाडी यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. अशातच आता शरद पवार यांनी कलमाडींच्या निधनानंतर भावूक पोस्ट केली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
advertisement
शरद पवारांचा मोठा वाटा
केंद्रीय मंत्री, ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (IOA) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने काम पाहिले. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला, असं शरद पवार म्हणाले.
कशाही मूल्यांशी तडजोड केली नाही
advertisement
राजकारणात मतभेद, संघर्ष आणि टीका अपरिहार्य असतात; मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सातत्याने जपली. सार्वजनिक जीवनातील चढ-उतारांमधून जात असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास सोडला नाही, असंही पवार यांनी म्हटलंय.
advertisement
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे… pic.twitter.com/yHXWfonjmc
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2026
advertisement
भावपूर्ण श्रद्धांजली!
दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून देशाच्या समाजकारण, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्वाचा व नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही सर्वजण कलमाडी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, हिच प्रार्थना, अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 10:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sharad Pawar : दिल्ली 'मॅनेज' करणारा मित्र गमावला! सुरेश कलमाडींच्या निधनानंतर शरद पवारांची भावुक पोस्ट










