पुणेकरांनो, ATMमध्येही सावधान! हसत बोलला, मदतही केली पण जाता जाता तरुण मोठा गेम करून गेला, समजताच मोठा धक्का
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दत्तात्रय संपत वडघुले हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अज्ञात तरुणाने "मी मदत करतो" असे म्हणत त्यांना १० हजार रुपये काढून दिले
पुणे : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणे एका ज्येष्ठ नागरिकाला भलतेच महागात पडले आहे. शिक्रापूर येथे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने ५० वर्षीय व्यक्तीची मोठी फसवणूक केली. त्याने या ज्येष्ठाच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून तब्बल ६० हजार रुपये लंपास केले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून डिजिटल व्यवहारात किती सतर्क राहावे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
काय घडली नेमकी घटना?
टाकळी भीमा येथील रहिवासी दत्तात्रय संपत वडघुले हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अज्ञात तरुणाने "मी मदत करतो" असे म्हणत त्यांना १० हजार रुपये काढून दिले. मात्र, हे करत असताना त्याने अत्यंत शिताफीने वडघुले यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून त्यांना दुसरेच बनावट कार्ड हातात टेकवले.
advertisement
वडघुले घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर ४० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा २० हजार रुपये काढल्याचा मेसेज आल्याने त्यांना धक्काच बसला. बँकेत चौकशी केली असता, त्यांच्या मूळ कार्डाचा वापर करून कोणीतरी पैसे लांबवल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 12:40 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, ATMमध्येही सावधान! हसत बोलला, मदतही केली पण जाता जाता तरुण मोठा गेम करून गेला, समजताच मोठा धक्का








