प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मुंबई तिसरा द्रुतगती मार्ग तयार होणार, 'या' महिन्यापासून कामाला सुरुवात

Last Updated:

Third Expressway Project : पुणे-मुंबईदरम्यान उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या द्रुतगती महामार्गाच्या कामाला मार्च 2026 पासून सुरुवात होणार आहे. पागोटे ते चौक टप्प्यातील बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले असून प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

News18
News18
मुंबई : पुणे-मुंबईदरम्यान उभारल्या जाणाऱ्या तिसऱ्या द्रुतगती मार्गाच्या कामाला येत्या मार्च 2026 पासून सुरुवात होणार आहे. पुणे-बंगळूरु द्रुतगती मार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्याचाच भाग म्हणून हा नवीन द्रुतगती महामार्ग विकसित केला जात आहे. या मार्गामुळे पुणे आणि मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.
पुणे-मुंबई प्रवास होणार 'स्मार्ट'
या प्रकल्पांतर्गत पागोटे ते चौक या सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या टप्प्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या विभागासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी सुमारे 70 टक्के भूसंपादन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केले आहे. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
काम कधी पूर्ण होणार?
दरम्यान या द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी एनएचएआयने निविदा मागविल्या होत्या आणि त्या येत्या 15 ते 20 दिवसांत अंतिम केल्या जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
advertisement
सहा मार्गिकांचा हा द्रुतगती महामार्ग सुमारे 3500 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे. पुणे ते बंगळूरु द्रुतगती मार्ग आधीच विकसित करण्यात येत असून त्याचा थेट मुंबईपर्यंत विस्तार केल्याने राज्यातील तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूक अधिक चांगली होणार आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन आर्थिक, औद्योगिक आणि व्यापारी हालचालींना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मुंबई तिसरा द्रुतगती मार्ग तयार होणार, 'या' महिन्यापासून कामाला सुरुवात
Next Article
advertisement
Nagar Parishad Election Results: शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आली धक्कादायक आकडेवारी
शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल
  • शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल

  • शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल

  • शिंदे गट १०, तर अजितदादांची १७ जिल्ह्यांत पाटी कोरीच, भाजपची काय स्थिती? समोर आल

View All
advertisement