पुणेकरांनो लक्ष द्या! नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांची कडक नियमावली, उल्लंघन केल्यास थेट होणार कारवाई
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नववर्षाचे स्वागत करत असताना नियमांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पुणे : काही दिवसांत नववर्षाला सुरुवात होत असून, त्याच्या स्वागतासाठी जगभरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. 31 डिसेंबरच्या रात्री शहरातील विविध ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हॉटेल्स, पब, लॉज, फार्महाऊस तसेच खासगी ठिकाणी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले जाते. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येते. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, किरकोळ वादातून हाणामारी होणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या घटना घडतात. या घटनांनाच आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
यावर्षी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक संवेदनशील असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकांचा काळ सुरू असल्याने पोलिस यंत्रणा आणि प्रशासन आधीच सतर्क आहे. त्यातच 31 डिसेंबरच्या जल्लोषामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान अधिक वाढले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
रात्री दीड वाजेपर्यंत परवाना
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी किंवा नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
advertisement
ब्रेथ अॅनालायझरचा वापर करणार
view commentsमद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. शहरातील विविध नाकाबंदी ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना कोणी आढळल्यास वाहन जप्ती, दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंदवला जाणार आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो लक्ष द्या! नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांची कडक नियमावली, उल्लंघन केल्यास थेट होणार कारवाई










