Shiv Sena UBT MNS Alliance: ''विषय संपलेला आहे, ठाकरे बंधू आता...'', ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत मोठी बातमी, ''काल रात्रीच्या बैठकीत...''
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election : मुंबईतील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी अपडेट दिली आहे.
मुंबई: आगामी मुंबईसह ठाणे आणि इतर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मुंबईतील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी अपडेट दिली आहे.मुंबई: आगामी मुंबईसह ठाणे आणि इतर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मुंबईतील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी अपडेट दिली आहे.
advertisement
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी म्हटले की, कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे. आता युतीबाबत कोणताही संभ्रम नाही. मुंबईसह इतर महापालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. युतीवर शिक्कामोर्तब झालं असल्याचे स्पष्ट संकेत संजय राऊत यांनी दिले.
आमच्यासाठी विषय संपला आहे...
संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती निश्चित झाली असून काल (२२ डिसेंबर) रात्री झालेल्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांमधील जागा वाटपांचा विषय संपला आहे. मुंबई महापालिकेतील जागा वाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता जागा वाटपांचा विषय संपला असल्याचे राऊत यांनी म्हटले. विद्यमान नगरसेवक यांच्या सोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. काही विद्यमान नगरसेवकांच्या जागा या मनसेकडे जाणार आहेत.
advertisement
कार्यकर्त्यांना आदेश पोहचले...
युती झाली असून जागा वाटपाबाबत घोषणा करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांसोबत बोलत असून एका पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि इतर माहिती दिली जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात असेही त्यांनी सांगितले. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांना कोणत्याही परिस्थिती उमेदवारी दिली जाणार नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.
advertisement
संजय राऊत यांनी म्हटले की, कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे, मनसे आणि शिवसेनेच्या युतीत कोणताही संभ्रम नाही. मुंबई आणि इतर पालिकेत कार्यकर्ते सोबत काम करायला सुरुवात झाली, तशा सूचना गेल्या आहेत.
मराठी भागातील जागांवरुन तणाव?
मराठी बहुल भागात जागा वाटपातील तणावाच्या चर्चांबाबत संजय राऊत यांनी म्हटले की, आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत. आमच्यात कुठेही तणाव नाही. जागा कोणताही कोणाकडे जावो, ते आमच्या युतीकडेच असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या दिवशी वरळीच्या डॉममध्ये दोन भाऊ एकत्र आले त्याच दिवशी युती झाली. कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम नाही, २०१७ ला युतीबाबत कोणतीच चर्चा नव्हती, त्यावेळी हवेत बाण सोडण्यात आले होते. त्यामुळे त्या चर्चांना आधार नसल्याचे राऊत यांनी म्हटले.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 10:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT MNS Alliance: ''विषय संपलेला आहे, ठाकरे बंधू आता...'', ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत मोठी बातमी, ''काल रात्रीच्या बैठकीत...''










