'तो आजही तिला पाहू शकत नाही, पण तिने प्रेमाने संसार थाटला' नेत्रहीन राहुल आणि देवताची अशीही लव्ह स्टोरी

Last Updated:

सामाजिक अडथळे आणि अंधत्वावर मात करत त्यांनी आपल्या प्रेमाला सत्यात उतरवलं. केवळ भावना नव्हे, तर विश्वास आणि समजूतदारपणाच्या आधारावर फुललेलं त्यांचं नातं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

+
Pune 

Pune 

प्राची केदारी, प्रतिनिधी 
पुणे : प्रेम अडथळे पाहत नाही, प्रेमासाठी कधीच कुठली मर्यादा नसते. पुण्यातील अंध राहुल देशमुख आणि देवता डोळस यांची प्रेमकहाणी काही वेगळीच आहे. सामाजिक अडथळे आणि अंधत्वावर मात करत त्यांनी आपल्या प्रेमाला सत्यात उतरवलं. केवळ भावना नव्हे, तर विश्वास आणि समजूतदारपणाच्या आधारावर फुललेलं त्यांचं नातं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 
advertisement
देवता या बीड येथील आहेत. उच्च शिक्षण घ्यायचं म्हणून त्या पुण्यात आल्या. बीए आणि एम बीए असे उच्च शिक्षण असलेल्या देवता नेत्रहीन दिव्यदृष्टी असलेल्या राहुल देशमुख यांना स. प. महाविद्यालयात भेटल्या. पुढे त्यांची चांगलीच मैत्री जमली. नेत्रहीन व दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कामाचा डोलारा राहुलने उभा केला होता. त्याचा त्या हळूहळू अविभाज्य भाग बनत होत्या. नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC) या संस्थेची संस्थापक विश्वस्त म्हणून कार्यरत आहे.
advertisement
'मी वेगळं आयुष्य जगतो असं मला कधी खरं वाटलं नाही. कॉलेजमध्ये असताना मित्र-मैत्रिणींमध्ये ती वेगळेपणाची दरी नसल्यामुळे मला खूप मित्र-मैत्रिणी मिळाल्या. देवता आणि मी स. प. कॉलेजमध्ये शिकत होतो. एकाच क्लासमध्ये असल्यामुळे आमच्या भेटीगाठी व्हायच्या. कॉलेजमध्ये असणारी लायब्ररी होती तिथे जाण्यासाठी पायऱ्या होत्या. त्या अगदी सराईतपणे चढायचो, उतरायचो तो आत्मविश्वास देवता यांना फार आवडला. मग पुढे आमची चांगली घट्ट मैत्री झाली आणि नंतर आम्ही विवाह देखील केला', अशा भावना राहुल देशमुख यांनी व्यक्त केल्या.
advertisement
लोकां काय म्हणतील याचा विचार न करता नेत्रहीन पण स्वतःवर प्रबळ आत्मविश्वास असलेल्या कर्तबगार राहुल देशमुखचा हात आयुष्यभरासाठी हाती घेतला व त्याच्याशी विवाहबद्ध होऊन समाजात एक नवीन पायंडा घालून दिला.
“अडचणी या आल्या. मी नोकरी सोडून हे सगळं करणं आणि राहुल यांची जीवनसाथी म्हणून निवड करणे हे पचवणं अवघड गेलं कारण यांच्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या. पण आई-वडिलांचा विश्वास होता की माझी मुलगी जे काही करेल ते विचारपूर्वक करेल. परंतु त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे सगळं शक्य झालं आणि आम्ही आज गेली 10 वर्षे झाली एकत्र राहत आहोत' अशा भावना देवता  यांनी व्यक्त केल्या.
advertisement
नेत्रहीन व दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या 'नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड' (NAWPC) या आगळ्यावेगळ्या संस्थेची स्थापना 2008 साली राहुल यांनी केली. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे राहुल यशस्वीपणे काम पाहत आहेत. यासोबतच त्यांच्या पत्नी देवता या देखील या कामात त्यांना मदत ही करत असतात. या दाम्पत्याचा हा सामाजिक कार्यातील प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहेच तसेच तो थक्क करणारा देखील आहे. या कामाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
advertisement
मराठी बातम्या/पुणे/
'तो आजही तिला पाहू शकत नाही, पण तिने प्रेमाने संसार थाटला' नेत्रहीन राहुल आणि देवताची अशीही लव्ह स्टोरी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement