पुणेकर बाप-लेकाने दुबई गाजवली, दुबईतील 100 किमी ट्रायथलॉन 6 तासांच्या आत केली पूर्ण, Video

Last Updated:

वय हा खरा अर्थाने फक्त आकडा आहे, हे दाखवून देणारी प्रेरणादायी कामगिरी दुबई येथे पार पडलेल्या T-100 World Tour Triathlon स्पर्धेत पाहायला मिळाली.

+
News18

News18

पुणे : वय हा खरा अर्थाने फक्त आकडा आहे, हे दाखवून देणारी प्रेरणादायी कामगिरी दुबई येथे पार पडलेल्या T-100 World Tour Triathlon स्पर्धेत पाहायला मिळाली. कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू नाथा ताम्हाणे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आपल्या 19 वर्षीय मुलगा गौरांगसोबत ही कठीण ट्रायथलॉन स्पर्धा 5 तास 50 मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केली. या स्पर्धेअंतर्गत 2 किमी स्विमिंग, 80 किमी सायकलिंग आणि 18 किमी रनिंग असा विस्तार असलेले एकूण 100 किमीचे आव्हान होते. या स्पर्धेत जगभरातून तब्बल 10 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान दुबईत ट्रायथलॉन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.
विष्णू ताम्हाणे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीतून केंद्र सरकारच्या फिट इंडिया मोहिमेला बळ मिळत असून, पोलिस दलासह समाजात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी दाखवलेली जिद्द व चिकाटी ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
advertisement
ताम्हाणे नी गेल्या सहा महिन्यांपासून या स्पर्धेसाठी तयारी केली होती. त्यांना Fitness First India चे संचालक विजय गायकवाड आणि Power Peaks चे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेत विजय गायकवाड आणि त्यांच्या टीमनेही सहभाग घेतला. सुनील ढाकणे यांनी ही स्पर्धा 4 तास 43 मिनिटांत पूर्ण करत वेगवान भारतीय स्पर्धकाचा बहुमान मिळवला.
advertisement
या दिवशी विष्णू आणि सुनीता ताम्हाणे यांचा 28 वा लग्नाचा वाढदिवस होता. स्पर्धा एकत्र पूर्ण करून त्यांनी पत्नीला दिलेली ही अनोखी भेट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. वय कमी-जास्त असलं तरी प्रयत्न प्रामाणिक असले की लक्ष्य गाठता येतं, असे मत ताम्हाणे यांनी व्यक्त केले.
स्पर्धेनंतर ताम्हाणे पिता-पुत्र आणि कन्या तेजस्वी यांनी 15000 फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून फिटनेस आणि कौटुंबिक एकतेचा संदेश देणारे हे कुटुंब आज अनेकांच्या प्रेरणेचे उदाहरण ठरत आहे. वडिलांसोबत 100 किमीची स्पर्धा पूर्ण करताना अंगावर काटा आला. तरुणांनी रोज किमान एक तास तरी फिटनेससाठी द्यायलाच हवा, अशी भावना गौरांग ताम्हाणे यांनी व्यक्त केली.
advertisement
वडील-मुलाची ही संयुक्त कामगिरी युवांसाठी एक आदर्श आहे, असे स्वतः विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले. दुबईतील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पिता-पुत्राने केवळ सहभाग घेतला नाही, तर ती उत्कृष्टरीत्या पूर्ण करून प्रत्येकाला तंदुरुस्ती, शिस्त आणि जिद्द असेल तर वय कोणतेही असू दे, लक्ष्य गाठता येते. त्यांच्या या कामगिरीने महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमी, पोलिस दल आणि तरुणाईला एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर बाप-लेकाने दुबई गाजवली, दुबईतील 100 किमी ट्रायथलॉन 6 तासांच्या आत केली पूर्ण, Video
Next Article
advertisement
ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement