advertisement

Pune Gas Shortage: पुणेकरांनो, जेवणाची सोय करा! शहरातील हॉटेल आणि खानावळी 'गॅस'वर, पुढील 24 तासात दिसेल 'ही' परिस्थिती

Last Updated:

पुढील 24 तासांत गॅस न मिळाल्यास पुणेकरांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. हॉटेलांवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांसह नोकरदारांचे हाल होणार आहेत.

शहरातील हॉटेल आणि खानावळी 'गॅस'वर (फाईल फोटो)
शहरातील हॉटेल आणि खानावळी 'गॅस'वर (फाईल फोटो)
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा थेट फटका आता पुणेकरांच्या 'जेवणा'ला बसताना दिसत आहे. पुण्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद झाल्याने शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स कधीही बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत गॅस न मिळाल्यास पुणेकरांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. हॉटेलांवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांसह नोकरदारांचे हाल होणार आहेत.
हॉटेलचालक संकटात, खाद्यपदार्थांची संख्या घटली
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने हॉटेलचालकांनी आधीच मेन्यू कार्डमधील पदार्थांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः डोसा, उत्तपा यांसारखे जास्त गॅस लागणारे पदार्थ हॉटेलमधून गायब होऊ लागले आहेत. "साठा संपला की हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नाही," अशी स्पष्टोक्ती पुणे रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर सरपोतदार यांनी दिली आहे. काही ठिकाणी इंडक्शन शेगड्यांचा वापर केला जात असला, तरी त्यांच्या तुटवड्यामुळे आणि वाढलेल्या किमतींमुळे हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.
advertisement
गॅसचा काळाबाजार तेजीत
दुर्दैवाची बाब म्हणजे, या टंचाईचा फायदा घेत गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. काळ्या बाजारात सिलिंडर दुप्पट किमतीला विकले जात असून, हॉटेलचालक नाइलाजास्तव ही मोठी किंमत मोजत आहेत. मात्र, ही धडपड फार काळ टिकणारी नाही. जर युद्धजन्य स्थिती सुधारली नाही आणि पुरवठा सुरळीत झाला नाही, तर अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खानावळी बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे असंच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांत शहरातील बहुतांश खानावळी आणि रेस्टॉरंट्स बंद पडतील.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Gas Shortage: पुणेकरांनो, जेवणाची सोय करा! शहरातील हॉटेल आणि खानावळी 'गॅस'वर, पुढील 24 तासात दिसेल 'ही' परिस्थिती
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement