advertisement

Pune Water Cut: पुण्याचं पाणी बंद होणार? महापालिकेला अवघ्या 15 दिवसांचा अल्टिमेटम, काय घडतंय?

Last Updated:

Pune Water Supply: पुणे महानगरपालिकेला 11.60 टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र हा कोटा पुढील 15 दिवसांपुरताच शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Water Cut: पुण्याचं पाणी बंद होणार? महापालिकेला 15 दिवसांची मुदत, कुणी दिला इशारा?
Pune Water Cut: पुण्याचं पाणी बंद होणार? महापालिकेला 15 दिवसांची मुदत, कुणी दिला इशारा?
पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून लवकरच पाणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेला शहरासाठी 11.60 टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र हा कोटा पुढील 15 दिवसांपुरताच शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात महापालिकेकडे जलसंपदा विभागाची एकूण 933 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम तातडीने न भरल्यास पुण्याचा पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात येईल, असा इशाराच जलसंपदा विभागाने दिला आहे.
933 कोटी रुपयांची थकबाकी
पुणे महानगरपालिका दर महिन्याला केवळ दहा कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यातच जलसंपदा विभागाने 953 कोटी रुपयांची नोटीस बजावली होती. पुणे महानगरपालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षात मंजूर कोट्यापेक्षा 8.84 टीएमसी अधिक पाणी वापरले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या नियमांनुसार मंजूर मर्यादेपेक्षा 25 टक्क्यांपर्यंत जादा वापर झाल्यास दीडपट दराने आकारणी केली जाते, तर त्यापेक्षा अधिक वापर झाल्यास पाणी दराच्या तिप्पट दंडाची तरतूद आहे. त्यामुळे थकबाकीचा प्रश्न लवकर निकाली न लागल्यास पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
पालिका महिन्याला फक्त 10 कोटी रुपयेच भरते
पुणे महानगरपालिकेकडून 2016 पासून अतिरिक्त पाणीवापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नियमांनुसार आकारणी केली आहे. महापालिकेकडे 952 कोटी 62 लाख रुपयांची थकबाकी होती. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 19 कोटी 75 लाख रुपये भरल्यानंतरही फेब्रुवारीअखेर 932 कोटी 88 लाख रुपये बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. महिन्याला फक्त 10 कोटी रुपयेच जमा होत आहेत. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 31 जानेवारीअखेर महापालिकेने 11.23 टीएमसी पाणीवापर केला असून उर्वरित 0.36 टीएमसी पाणी पुढील 12 दिवसांत वापरले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
खडकवासला प्रकल्प अंतर्गत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिका मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी वापरत आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठी पाणी कमी पडत असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी वाढली आहे. महापालिकेने तातडीने थकबाकी भरावी, अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut: पुण्याचं पाणी बंद होणार? महापालिकेला अवघ्या 15 दिवसांचा अल्टिमेटम, काय घडतंय?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement