Weather Forecast : पुढील 24 तास महत्त्वाचे, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव कायम राहील. तापमान आणि पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई : 12 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रात हवामान उष्ण आणि काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव कायम राहील. तापमान आणि पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. शहरात दुपारी उष्णता आणि आर्द्रता जाणवेल, परंतु संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, पण पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
पुण्यात कमाल तापमान 38 अंश आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सांगलीत दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा येथे तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर संध्याकाळी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी येथे तापमान 39 अंश सेल्सिअस राहील, तर जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा देत नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी प्यावे आणि हलके कपडे परिधान करावेत, असे आवाहन आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सावध राहण्यास सांगितले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
view comments
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 11, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Weather Forecast : पुढील 24 तास महत्त्वाचे, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट










