उष्णतेच्या झळा! सोलापूरमध्ये पारा 36 अंशावर, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अपडेट पाहिलं का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
सोलापूर वगळता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.
पुणे : राज्यात सर्वच भागांतील कमाल आणि किमान तापमानात सतत घट आणि वाढ होताना दिसून येत आहे. सोलापूर वगळता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूरमधील तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
पुण्यातील तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. 10 फेब्रुवारीला पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
साताऱ्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीला साताऱ्यात निरभ्र आकाश असणार आहे. साताऱ्यातील तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
सांगलीमधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगली मध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. इतर शहरांप्रमाणे सांगली मधील तापमानात देखील काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.
सोलापूरमध्ये 10 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. सोलापूरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांतील तापमानात काहीशी घट झालेली दिसून येत आहे. मात्र, सोलापूरमधील किमान तापमानात वाढ झालेली बघायला मिळत आहे.
advertisement
कोल्हापूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीला कोल्हापूर मध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. कोल्हापूरमधील तापमानात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता काही प्रमुख शहरांमधील तापमानात घट झालेली दिसून येत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीस राज्यातील सर्वच भागात थंडी कमी होऊन किमान तापमानात वाढ झाली. त्याचबरोबर सर्वत्र उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली. तापमानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 10, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
उष्णतेच्या झळा! सोलापूरमध्ये पारा 36 अंशावर, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अपडेट पाहिलं का?