PMC Election : पुण्यात राष्ट्रवादीकडून गुंडाच्या पायघड्या, आंदेकरांना तिकीट का दिलं? पत्रकारांनी प्रश्न विचारताच सांगितलं कारण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
NCP On Ticket to Gangster Andekar : स्थानिक स्थरावर कोणतंही चुकीचं काम घडलं नाही, असं म्हणत आंदेकरांना क्लिन चीट देण्याचं काम अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे.
Pune Gangster in Election (अभिजित पोटे, प्रतिनिधी) : पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 120 ते 125 एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर शरद पवार गटाकडून 40 ते 50 एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे दोन्ही गटातील उमेदवारांना योग्यरित्या फॉर्मचं वाटप झालं आहे, अशी माहिती अजित पवार गटाचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी दिली. पुण्यात गजानन मारणे, बंडू आंदेकर, पिंटू धावडे ,रोहीदास चोरगे आणि बापू नायर यांना उमेदवारी देण्यात आलीये. त्यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबात उमेदवारी का देण्यात आली? असा सवाल केल्यावर अजितदादा गटाने हात वर केल्याचं पहायला मिळालं.
आमच्या पक्षाकडून आधीही नगरसेवक...
तुम्ही आजपर्यंत पुणे शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पाहा अथवा राज्याच्या राजकारणामध्ये पाहा अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घरामध्ये उमेदवाऱ्या दिल्या जातात. विशेषत: महिलांना संधी दिली जाते. ज्यांना आम्ही तिकीटं दिली, ते अधिही आमच्या पक्षाकडून आधीही नगरसेवक होते. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा संधी दिली आहे, असं अजित पवार गटाचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी ते पक्षामध्ये होते, तेव्हा असा कुठलाही चुकूचा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे लोक त्यांना निवडून देतात. ज्या महिला उमेदवार आहेत, त्यांनी तिथं चांगलं काम केलं असेल, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली गेल्याचं विकास पासलकर यांनी म्हटलंय.
advertisement
बापू नायरला संधी का दिली?
बापू नायरला संधी का दिली? असा सवाल केल्यावर, पक्षाचं राजकारण म्हणून पाहत नाही तर लोकांचा कल असतो. स्थानिक लोक मागणी करतात, त्यामुळे आम्ही त्यांना संधी दिली. स्थानिक प्रश्नांवर मदत करत असतात, त्यामुळे लोक तशी मागणी करतात, असं स्पष्टीकरण देण्यात आलं. न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. आंदेकर कुटूंब गेली 30 ते 35 वर्ष स्थानिक राजकारणामध्ये आहे. प्रत्येक पक्षाने त्यांना संधी दिली आहे. तिथल्या स्थानिक लोकांची कोणतीही तक्रार नाहीये. स्थानिक स्थरावर कोणतंही चुकीचं काम घडलं नाही, असं म्हणत आंदेकरांना क्लिन चीट देण्याचं काम अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे.
advertisement
स्थानिक नागरिकांचा रेटा...
दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बोलताना त्या कुटुंबातील महिलांवर काही आरोप नाही . स्थानिक नागरिकांचा रेटा आहे त्यांना उमेदवारी द्या म्हणून पक्षाने संधी दिलीय. सर्वच राजकीय पक्षामध्ये होत असते, असं म्हणत अजित पवार गटाने हात झटकल्याचं पहायला मिळत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
PMC Election : पुण्यात राष्ट्रवादीकडून गुंडाच्या पायघड्या, आंदेकरांना तिकीट का दिलं? पत्रकारांनी प्रश्न विचारताच सांगितलं कारण!










