Pune: सोसायटीमध्ये लिफ्ट तुटून तरुणाचा मृत्यू, चेअरमन आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
- Published by:Sachin S
Last Updated:
या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दुडम, प्रतिनिधी
मावळ: गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये काम करण्यावरून बरेच वाद विवाद असतात. सोसायटीची देखभाल करण्याची जबाबदारी ही सोसायटीच्या सेक्रेटरी, चेअरमन आणि कमिटीची असते. अशाच एका सोसायटीमध्ये तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सोसायटीच्या चेअरमन आणि पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले आहे,. पुणे जिल्ह्यातील तळेगावमधील एका सोसायटीमध्ये लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोसायटी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगावमधील निसर्ग सोसायटीमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. या सोसायटीत राहणारे दिनेश सुरंगे हे सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी लिफ्टने खाली उतरत होते. यावेळी सहाव्या आणि सातव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अचानक अडकली. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच लिफ्टचा दोर तुटून लिफ्ट थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात दिनेश सुरंगे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने तळेगाव येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेला सोसायटी व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत फिर्यादी रितेश सुरंगे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार निसर्ग हाऊसिंग सोसायटी बी विंगचे चेअरमन पुंडलिक वारके आणि इतर पदाधिकाऱ्यांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०६(१), १२५ तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ते तीन महिने हे कुटुंब खचलं होतं. त्यामुळे अखेर कुटुंबीयांनी या घटनेला वाचा फोडण्यासाठी अखेर तळेगांव दाभाडे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगांव दाभाडे पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 4:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: सोसायटीमध्ये लिफ्ट तुटून तरुणाचा मृत्यू, चेअरमन आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल









