Tilak on forehead: कपाळावर टिळा लावणं, नाम ओढण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील

Last Updated:

Tilak on forehead: राजा महाराज जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा प्रथम आपल्या पूज्य देवतेचे स्मरण करून कपाळावर टिळा लावून किंवा नाम ओढून जायचे. कपाळावर टिळा लावण्याचे महत्त्व हिंदू पुराणात सविस्तरपणे सांगितलं आहे.

News18
News18
मुंबई, 27 डिसेंबर : हिंदू धर्मात अनेक परंपरा प्रचलित आहेत, त्यापैकी एक म्हणजे कपाळावर टिळा किंवा टिळक लावणे. अनेकदा आपण देवळात गेल्यावर किंवा घरात पूजा, यज्ञ, हवन वगैरे झाल्यावर टिळा लावतो. टिळा लावण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आली आहे. पूर्वीच्या काळी लोक कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी टिळा लावायचे. राजा महाराज जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा प्रथम आपल्या पूज्य देवतेचे स्मरण करून कपाळावर टिळा लावून किंवा नाम ओढून जायचे. कपाळावर टिळा लावण्याचे महत्त्व हिंदू पुराणात सविस्तरपणे सांगितलं आहे.
कपाळावर टिळा लावण्याचे केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर आता शास्त्रज्ञही त्याचे महत्त्व स्वीकारू लागले आहेत. कपाळावर टिळा लावल्याने अनेक फायदे होतात. कपाळावर टिळक लावण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
टिळा लावण्याचे नियम -
आपल्या शरीरात 7 चक्रे असतात. या चक्रांपैकी एक म्हणजे कपाळाच्या मध्यभागी असलेले आज्ञा चक्र. टिळा नेहमी आज्ञा चक्रावरच लावावा. अनेकजण टिळक अनामिक बोटाने लावतात, असे केल्याने मान-प्रतिष्ठा वाढते. अंगठ्यानेही टिळा लावला जातो. असे केल्याने ज्ञान प्राप्त होते, असे मानले जाते. त्याचबरोबर कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तर्जनीने टिळा लावला जातो.
advertisement
देवावरील विश्वासाचे प्रतीक -
धार्मिक पुराणात टिळा हा देवावरील श्रद्धेचे प्रतीक मानला जायचा, म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी टिळा लावला जातो. असे मानले जाते की कपाळावर टिळा लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते. भारतात चंदन, गोपीचंदन, सिंदूर, रोळी आणि भस्म, अष्टगंध, गुलाल असे अनेक प्रकारचे टिळक आहेत.
advertisement
सात्त्विकता -
टिळक लावल्याने व्यक्तिमत्वात सात्त्विकता दिसून येते. तसेच टिळक लावण्याचे अनेक मानसिक परिणाम आहेत. यामुळे आत्मविश्वासाची पातळी वाढते. याशिवाय रोज टिळक लावणाऱ्याचे मन शांत राहते. प्रतिकूल परिस्थितीतही मन विचलित होत नाही आणि शांतता अबाधित राहते.
डोकेदुखीचा त्रास - जो व्यक्ती रोज कपाळावर टिळा लावतो, त्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही, असे सांगितले जाते. कपाळावर टिळा लावल्याने मनात नकारात्मक भावना येत नाहीत आणि दिवसभर तुम्ही धैर्याने काम करत राहता.
advertisement
पापांपासून मुक्तता - हिंदू धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, जो व्यक्ती आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो, तो पापांपासून मुक्त होतो. कपाळावर हळदीचा टिळा लावल्यानं त्वचा आणि शरीर तजेलदार राहते आणि हळद बॅक्टेरियाविरोधीही असते.
घरात खाण्या-पिण्याची कमतरता राहत नाही - असे मानले जाते की, जे लोक पूर्वतिथीला कपाळावर टिळा लावतात, त्यांच्या घरात कधीही खाण्यापिण्याची कमतरता भासत नाही, टिळा लावल्याने ग्रहांच्या दोषांपासून मुक्ती मिळते आणि भाग्य बलवान होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tilak on forehead: कपाळावर टिळा लावणं, नाम ओढण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement