Vastu Tips In Marathi: घरात पैसा टिकत नाही? मग लावा 'हे' झाड, पैशांची होईल भरभराट
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आवळ्याच्या झाडाला वास्तुशास्त्रात शुभ मानले गेले आहे. याचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
मुंबई : जर घरात पैसा टिकत नसेल तर हा छोटासा उपाय नक्की करून पहा. आवळ्याच्या झाडाला वास्तुशास्त्रात शुभ मानले गेले आहे. याचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यासोबतच घरात धनधान्य आणि धनाची वाढ होते. सुख-समृद्धीची होते प्राप्ती आवळा वृक्षात भगवान विष्णूचा वास असल्याचे मानले जाते. म्हणूनच पंचमीतिथीला भारतीय आवळीच्या झाडाखाली ब्राह्मणांना नियमित अन्न अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि धन-समृद्धी मिळते.
आवळा वृक्ष लावण्यासाठी कोणता दिवस शुभ? गुरुवार, शुक्रवार, अक्षय नवमी व्यतिरिक्त अमलकी एकादशीला आवळा वृक्ष लावणे शुभ मानले जाते. आयुष्याला कलाटणी देणारे आहेत हे 7 संकेत, स्वत:हून चालून येतो पैसा कोणत्या दिशेला लावावा? जर तुम्ही घरामध्ये आवळ्याचे झाड लावत असाल तर तुम्ही ते उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावू शकता. या दिशेला लागवड केल्यास शुभ फळ मिळते.
advertisement
बायको सारखी भांडते? प्रत्येक नवऱ्याने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनासाठी आवळ्याच्या झाडाच्या खालच्या भागात ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू आणि खोडात भगवान शिव वास करतात असे मानले जाते. अशा स्थितीत ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात काही ना काही समस्या असतील त्यांनी अमलकी एकादशीच्या दिवशी भारतीय आवळीच्या झाडाच्या खोडाभोवती एक धागा सात वेळा गुंडाळावा. धागा बांधल्यानंतर तुपाचा दिवा आणि कापूर लावून आरती करावी.
advertisement
प्राची ढोले, प्रतिनिधी
view comments(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2024 11:39 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips In Marathi: घरात पैसा टिकत नाही? मग लावा 'हे' झाड, पैशांची होईल भरभराट









