Astro Tips In Marathi: जीवनात सुख-समृद्धी हवी असेल तर करा हा सोपा उपाय
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Astro Tips In Marathi: माणसाच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येवरचा उपाय ज्योतिषशास्त्रात आहे. याशिवाय या उपायाचे अनेक फायदे आहेत.
प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या समस्या असतात. या समस्यांवर प्रत्येक जण आपापल्या परीनं उपाय शोधत असतो. ज्योतिषशास्त्रात जीवनातल्या अनेक समस्यांवर उपाय सांगितले गेले आहेत. या शास्त्रात एक सोपा आणि खास उपाय सांगितलेला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. हा उपाय केल्यास तुमचे आजार दूर होऊन आरोग्य सुधारू शकतं. तसंच नकारात्मक ऊर्जा दूर होते. याशिवाय या उपायाचे अनेक फायदे आहेत. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
माणसाच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येवरचा उपाय ज्योतिषशास्त्रात आहे. एखाद्या कारणामुळे दीर्घ काळापासून चिंतेत असाल, जीवनात सुख-समृद्धी हवी असेल, वाईट स्वप्नं पडत असल्याने त्रस्त असाल किंवा इतर कोणताही दोष असेल तर त्यावरचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. या शास्त्रात सांगितलेल्या एका सोपा आणि खास उपायाची माहिती घेऊ या. या उपायामुळे जीवनातल्या सर्व समस्या दूर होतात. रात्री झोपताना डोक्याजवळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवलं आणि झोपलात, तर त्यामुळे खूप फायदा होऊ शकतो.
advertisement
तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं आरोग्यासाठी लाभदायक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रातदेखील तांब्याचं भांडं पवित्र मानलं जातं. त्यामुळे या शास्त्रात तांब्याच्या भांड्याचा वापर करून करता येतील असे अनेक उपाय सांगितले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावं. त्यानंतर पाण्याने भरलेलं भांडं डोक्याजवळ ठेवून झोपावं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे पाणी एखाद्या झाडाला घालावं. हा उपाय सलग 43 दिवस केला तर संबंधित व्यक्तीचं आरोग्य सुधारू शकतं. तसंच त्याच्या जीवनात प्रगती होते.
advertisement
रात्री झोपताना डोक्याजवळ तांब्याचं भांडं पाण्याने भरून ठेवलं तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. संबंधित व्यक्तीच्या जीवनातलं दुःख दूर होऊन जीवनात समाधान मिळायला लागतं. तसंच जर एखादी व्यक्ती सतत वाईट स्वप्नं पडत असल्याने त्रस्त असेल तर त्याची ही समस्या या उपायाने दूर होते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर या उपायाने या दोषातून मुक्ती मिळते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2024 6:53 AM IST