श्रीकृष्ण जन्माष्टमीला शंभर वर्षांची परंपरा; इथं घरातच होतेय कान्होबाचे पूजन

Last Updated:

वर्ध्यातील लाकडे यांच्या घरी 100 वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी होते. पाहा दीड दिवसांच्या कान्होबा कसा असतो?

+
श्रीकृष्ण

श्रीकृष्ण जन्माष्टमीला शंभर वर्षांची परंपरा; इथं घरातच होतेय कान्होबाचे पूजन

वर्धा, 7 सप्टेंबर: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह संपूर्ण भारतभरात बघायला मिळतोय. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषेमध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा होत आहे. अशाच प्रकारच्या जन्माष्टमीची परंपरा वर्ध्यातल्या लाकडे यांच्याकडे तब्बल शंभर वर्षांपासून जपली जात आहे. कृष्णाची मूर्ती घरी विराजमान करून दीड दिवस हा उत्सव साजरा होतो त्याला कान्होबा असंही लाडानं संबोधलं जातं.
मोजक्या घरामध्ये होतो जन्माष्टमीचा सण
गणेशोत्सवात गणपती घरोघरी विराजमान होत असतो. अगदी तसेच विदर्भात फार क्वचित घरांमध्ये जन्माष्टमीला कान्होबाचे पूजन होते. लाकडे यांच्या घरी दीड दिवस कान्होबाचे पूजन केले जाते. त्यासाठी संपूर्ण परिसरच एकत्र होतो आणि सगळे मिळून मोठ्या उत्साहात हसत खेळत, नाचत गात हा सण साजरा करतात. भजन, कीर्तन गुलाल उधळून मध्यरात्रीपर्यंत कृष्ण जन्माष्टमीचा आनंद हा आगळावेगळाच असतो. गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा कायम असल्याचे मालाताई लाकडे यांनी सांगितले.
advertisement
अशी सुरू झाली परंपरा
100 वर्षांपूर्वी लाकडे यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळ जन्माला आलं. त्याचं नाव श्रीकृष्ण ठेवलं आणि तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झाली अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. काही दिवसांपासूनच जन्मोत्सवाची सुरुवात केली जाते. डेकोरेशन, फराळ, नैवेद्य, फुलोरा यासंदर्भात कामाला सुरुवात होते आणि मोठ्या उत्साहात दीड दिवसाच्या कान्होबाचा पाहुणचार, पूजन, आदरातिथ्य केलं जातं, असं मालाताई लाकडे यांनी सांगितलं.
advertisement
बालकृष्णाचा हलवला पाळणा
रात्री बारा वाजता कृष्णजन्म झाल्यावर बाळ कृष्णाचा पाळणा हलविण्यात आला. कृष्ण नामाचा गजर करत फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि प्रसाद वाटण्यात आला. यावेळ सर्वजण भजन कीर्तनाच्या नादात दंग होते. जन्माष्टमीला गुलालाची उधळण करून होळीचे स्वरूप परिसरातील नागरिकांनी दिले. मध्यरात्रीपर्यंत गुलाल आणि पाण्याची उधळण सुरू होती दरवर्षी हेच चित्र जन्माष्टमीला लाकडे यांच्याकडे दिसते, असेही कुटुंबीय सांगतात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
श्रीकृष्ण जन्माष्टमीला शंभर वर्षांची परंपरा; इथं घरातच होतेय कान्होबाचे पूजन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement