कलियुगाची सुरूवात कशी झाली? हेच 'ते' आश्रम जिथे मिळाले पुरावे; उलगडलं महाभारतातील गूढ रहस्य!

Last Updated:

पश्चिम उत्तरप्रदेशातील मेरठजवळील परीक्षितगड हा महाभारत काळातील राजा परीक्षितच्या राज्यासाठी प्रसिद्ध आहे. येथेच श्री श्रृंगी ऋषींचा आश्रम असून, इथूनच...

Shringi Rishi Ashram
Shringi Rishi Ashram
पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ शहर हे महाभारताच्या काळापासून ओळखलं जातं. मेरठमधील हस्तिनापूर आणि किल्ले परीक्षितगड ही दोन्ही स्थळं महाभारताच्या अनेक रहस्यमय कथांनी भरलेली आहेत. किल्ले परीक्षितगडमध्ये असलेल्या श्री श्रृंगी ऋषी आश्रमाबद्दलही अशाच अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. शेकडो वर्षांपासून अशी एक मान्यता आहे की, याच आश्रमातून कलियुगाची सुरुवात झाली होती. हस्तिनापूरच्या विविध पैलूंवर दीर्घकाळापासून संशोधन करत असलेले तज्ज्ञ सहाय्यक प्राध्यापक प्रियांक भारती यांच्याशी ‘लोकल 18’ ने संवाद साधला.
सहाय्यक प्राध्यापक प्रियांक भारती यांनी सांगितले की, किल्ले परीक्षितगड हे अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याच्या नावाने ओळखले जाते. हे परीक्षितचे राज्य होते. येथेच श्री श्रृंगी ऋषी आश्रम बांधलेला आहे. असं म्हटलं जातं की, याच आश्रमातून कलियुगाला सुरुवात झाली. आजही इथे अशी काही चिन्हं पाहायला मिळतात, जी या घटनांना जिवंत ठेवतात.
advertisement
...अशी झाली सुरुवात
प्राध्यापक प्रियांक भारती यांनी सांगितले की, सरस्वती नदीच्या काठावर शिकार करत असताना राजा परीक्षितची भेट कलियुगाशी झाली. त्याने राजा परीक्षितकडे स्वर्गात जागा मागितली. राजा परीक्षितने त्याला जागा दिली आणि तो राजाच्या मुकुटात शिरला. असं म्हणतात की, कलियुगाने प्रवेश करताच त्याने राजा परीक्षितच्या बुद्धीवर ताबा मिळवला. जेव्हा राजाला तहान लागली, तेव्हा तो श्री श्रृंगी ऋषी आश्रमात पोहोचला. आश्रमात शमीक ऋषी तपस्येत लीन होते. राजा परीक्षितने त्यांना अनेकदा पाणी मागितले. जेव्हा शमीक ऋषींनी त्याचे काही ऐकले नाही, तेव्हा त्याने एक मृत साप शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला.
advertisement
हे दृश्य शमीक ऋषींचे पुत्र श्री श्रृंगी ऋषी यांनी पाहिले आणि ते संतापले. त्यांनी राजा परीक्षितला सात दिवसांच्या आत सर्पदंशाने मृत्यू येण्याचा शाप दिला. यानंतर सर्पराज तक्षकाने राजा परीक्षितला दंश केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
...आणि राजा तक्षक व नागराज वासुकी वाचले
वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जनमेजयाने संतापाच्या भरात राजा तक्षकापासून सूड घेण्यासाठी सर्पयज्ञ सुरू केला. त्याचे अवशेष आजही आश्रमात पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की, जेव्हा सर्व साप यज्ञकुंडात भस्मसात झाले, तेव्हा राजा तक्षक आणि वासुकीची वेळ आली. राजा वासुकीने देवी-देवतांना आवाहन केले. तेव्हा भगवान इंद्र, आस्तिक मुनी आणि इतर देवी-देवतांनी जनमेजयाला समजावले. त्यानंतर त्याचा सर्पयज्ञ संपला आणि राजा तक्षक व नागराज वासुकी वाचले.
advertisement
मराठी बातम्या/अध्यात्म/
कलियुगाची सुरूवात कशी झाली? हेच 'ते' आश्रम जिथे मिळाले पुरावे; उलगडलं महाभारतातील गूढ रहस्य!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement