advertisement

Bhaubeej 2023: ओवाळीते मी भाऊराया..! भावाला औक्षण, टिळा लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

Last Updated:

Bhaubeej 2023: हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. यावेळी बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. भाऊबीजेला औक्षण करताना टिळा लावण्याचे विशेष महत्त्व आहे.

News18
News18
मुंबई, 11 नोव्हेंबर : बहिण-भावाचं नातं समृद्ध करणारा सण म्हणजे भाऊबीज. दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीज झाली की संपतो. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच दिवाळीतील भाऊबीजच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात.
हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. यावेळी बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. भाऊबीजेला औक्षण करताना टिळा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया भाऊबीज सणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
भाऊबीज सणाचे महत्व -
पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातात आणि तिला काही वस्तू भेट म्हणून देतात. त्या बदल्यात बहिणी आपल्या भावाचे स्वागत करतात आणि त्याला जेवण देऊन औक्षणाने आदरातिथ्य करतात. पौराणिक मान्यतेनुसार असे केल्याने, अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते आणि दीर्घायुष्याचे वरदान मिळते. भाऊबीजेशी संबंधित काही विशेष नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा -
भाऊबीजेला भावाला औक्षण करून टिळा लावताना दिशेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार टिळा लावतेवेळी भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे. त्याचबरोबर बहिणीचे तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेला असणे शुभ असते.
advertisement
औक्षण करण्यासाठी ईशान्य दिशेला पाठ मांडणे श्रेयस्कर आहे, हे लक्षात ठेवा. औक्षण करण्याच्या जागी पीठ आणि शेणाचा वापर केला तर उत्तम. भावाला पाठावर बसून औक्षण करावे टिळा लावावा. यासोबतच मनगटावर धागा बांधून ताट ओवाळू शकता. भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Bhaubeej 2023: ओवाळीते मी भाऊराया..! भावाला औक्षण, टिळा लावताना या गोष्टी लक्षात ठेवा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement