धन प्राप्तीसाठी दिवाळीत कुबेर पूजा कशी करावी? हा मंत्र माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचा धनत्रयोदशीपासून प्रारंभ होतो.
छत्रपती संभाजीनगर, 7 नोव्हेंबर : दिवाळीला काहीच दिवस बाकी असून सर्वत्र उत्साह आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. धनत्रयोदशीच्या दिवशी संपत्ती आणि आरोग्य देवतांची पूजा केली जाते. लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केली जाते. घरात स्थिर संपत्ती राहावी अशी इच्छा असेल तर ही पूजा कशी करावी याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आनंद कळवे गुरुजी यांनी माहिती दिली आहे.
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी गाई आणि कुबेर देव यांची पूजा करावी. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते. तसेच कुबेर देवतेची पूजा केल्यानंतर आपल्या घरी लक्ष्मीची स्थिरता लाभते. त्यासोबतच आयुर्वेदिक धन्वंतरी यांचे देखील पूजा करावी. यामुळे देखील आपलं आरोग्य देखील चांगले राहाते, असे गुरुजी सांगतात.
advertisement
अशी करावी पूजा
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला घर स्वच्छ करावे. देवघरामध्ये महाविष्णू स्वरूप असलेले कुबेर देवता यांची सोन्याची किंवा चांदीचे नाणे असलेली प्रतिमा स्वच्छ स्नान घालून त्याची पूजा करावी. गंध, फुल, अक्षदा, धूप, नैवेद्य कुबेर देवाला दाखवावा. हे केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. पूजा केल्यानंतर कुबेर देवता मंत्र म्हणावं ' श्री कुबेराय नमः ' हा मंत्र 108 वेळा जप करावा. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहते आणि घरात सुख शांती देखील नांदते, असे कळवे गुरुजी सांगतात.
advertisement
धन्वंतरी पूजेला महत्त्व
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करावी. यामुळे आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं. आरोग्य हे संपत्तीसमान आहे. त्यामुळे आरोग्य देवतेची उपासना करावी. त्यामुळेही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते, असेही गुरुजी सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 07, 2023 2:04 PM IST