advertisement

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का करतात झाडूची पूजा? पाहा शास्त्र काय सांगतं?

Last Updated:

Diwali Lakshmi Pujan: दिवाळीतील लक्ष्मीपूजनाल केरसुणी म्हणजेच झाडूची पूजा केली जाते. याचं शास्त्रीय कारण जाणून घेऊ.

+
दिवाळीत

दिवाळीत लक्ष्मी पूजनाला का करतात झाडूची पूजा? शास्त्र काय सांगतं?

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या विविध दिवसांत काही परंपरा आणि प्रथा पाळल्या जातात. या काळात घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. पण त्यासोबत अजून एका गोष्टीची पूजा केली जाते, ती म्हणजे झाडू किंवा केरसुणी होय. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाल केरसुणी म्हणजेच झाडूची पूजा का केली जाते? याबाबत शास्त्र काय सांगतं? हेच छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिषतज्ज्ञ श्रीरामजी धानोरकर यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची आणि गणपती बाप्पाची पूजा करतो. या दिवशी घरामध्ये सर्व दिवे लावून घर अगदी दीपमय केलं जातं. या दिवशी आपण केरसुणी अर्थात झाडूची पूजा करतो. कारण आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी झाडूचा वापर केला जातो. म्हणजेच घरातील केर कचरा बाहेर काढताना त्यासोबत इतरही वाईट वस्तू घरातून बाहेर काढल्या जातात. म्हणजेच अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी वापरला जाणारा झाडू हे लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे झाडूची पूजा केली जाते, असं धानोरकर गुरुजी सांगतात.
advertisement
झाडूचे दोन प्रकार
झाडूमध्ये देखील दोन प्रकार असतात. एक मोठा झाडू आणि एक छोटा झाडू. जो मोठा झाडू आहे तो आपण आपल्या घरातील साफ सफाई साठी वापरू शकतो. तर छोटा झाडू हा आपल्या घरातील देवघर किंवा ज्या ठिकाणी आपण आपले देव ठेवलेले आहेत, त्याच्या समोरची जागा साफ करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे पूर्वीपासून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा चालत आलेली आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी त्यासोबत लक्ष्मी सुद्धा नांदते. त्यासाठीच लक्ष्मीपूजनाला आपल्याकडे झाडूची पूजा केली जाते, असे गुरुजींनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का करतात झाडूची पूजा? पाहा शास्त्र काय सांगतं?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement