घरात बंद घड्याळ ठेवलंय? आत्ताच काढून टाका, तरच नशिब देईल साथ; अन्यथा होत्याचं नव्हतं होईल!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार घरात बंद किंवा बिघडलेली घड्याळ ठेवणं अशुभ मानलं जातं. यामुळे जीवनातील कामं अडतात आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते. तज्ज्ञांच्या मते, जुने घड्याळ टाकताना त्याच्यासोबत आपल्या...
आपल्या सगळ्यांच्या घरात कधी ना कधी एक घड्याळ बंद पडतं आणि ते तसंच पडून राहतं. काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही लोक ते सजावटीचा भाग म्हणून तसंच टांगून ठेवतात. पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे खूप मोठी चूक आहे. असं मानलं जातं की बंद पडलेलं घड्याळ केवळ वेळ थांबवत नाही, तर तुमच्या आयुष्यातील प्रगती आणि समृद्धीवरही परिणाम करतं. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत...
घरात बंद घड्याळ ठेवणे योग्य नाही
घरात बंद घड्याळ ठेवणे चांगले मानले जात नाही. ते अडथळे, रखडलेली कामं आणि बिघडलेली परिस्थिती दर्शवते. अशा परिस्थितीत, तुमच्या घरात कुठंही बंद घड्याळ असेल, तर ते त्वरित काढून टाकावे. पण त्याआधी जर एक खास उपाय केला, तर हेच बंद घड्याळ तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग उघडू शकतं.
advertisement
बंद घड्याळाशी संबंधित खास उपाय
जेव्हा तुम्ही बंद घड्याळ घरातून बाहेर फेकायचा निर्णय घेता, तेव्हा ते थेट कचऱ्यात फेकू नका. त्याआधी एक छोटी गोष्ट करा. तुमच्या समस्येचं प्रतीक त्या घड्याळाला जोडा. उदाहरणार्थ, जर तुमच्या नात्यात तणाव असेल, तर त्या समस्येशी संबंधित एक शब्द किंवा चित्र कागदावर काढा आणि ते घड्याळासोबत लपेटून घ्या. आता ते सगळं एका काळ्या कपड्यात बांधून घरापासून दूर एका स्वच्छ कचरापेटीत ठेवा. परत येत असताना मागे वळून पाहू नका. असं मानलं जातं की असं केल्याने तुमची नकारात्मकता तिथेच राहते आणि तुम्ही एका नव्या सुरुवातीसाठी तयार होता.
advertisement
घरात कोणतं घड्याळ आणावं
जर तुम्ही नवीन घड्याळ लावण्याचा विचार करत असाल, तर पेंडुलम असलेलं (लोलक असलेलं) भिंतीवरचं घड्याळ चांगला पर्याय ठरू शकतं. हे पूर्वी खूप सामान्य होते आणि आजही वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानले जातात. ते घराच्या पूर्व दिशेला लावणं फायदेशीर मानलं जातं, कारण ही दिशा उगवत्या सूर्याची आहे आणि नवीन ऊर्जेचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे पुढच्या वेळी जर घड्याळ बंद पडलं, तर त्याला हलक्यात घेऊ नका - कदाचित तेच घड्याळ तुमच्या चांगल्या वेळेची किल्ली ठरू शकतं.
advertisement
हे ही वाचा : काकाशी भांडण करणं पडू शकतं महाग; शनि लागतो हात धुवून मागे, ज्योतिषांनी सांगितले 'हे' उपाय!
हे ही वाचा : Vaishakh Month 2025 : वैशाख महिन्यात 'या' देवांची करा पूजा, उजळेल भाग्य अन् आर्थिक अडचणी होतील दूर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 15, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
घरात बंद घड्याळ ठेवलंय? आत्ताच काढून टाका, तरच नशिब देईल साथ; अन्यथा होत्याचं नव्हतं होईल!