शनिवारी हनुमान चालीसा कधी आणि किती वेळा पठण करावी? योग्य फायद्यासाठी जाणून घ्या उत्तर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हनुमान चालीसा आणि शनिदेव यांची उपासना शनिवारी कशी करावी, योग्य वेळ, पद्धत आणि लाभ जाणून घ्या. सकारात्मक ऊर्जा मिळवा.
Hanuman Chalisa : शनिवार हा दिवस न्यायदेवता शनिदेव आणि संकटमोचक हनुमान यांच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्यावर शनीची साडेसाती किंवा ढैय्या सुरू आहे, त्यांच्यासाठी हनुमान चालीसाचे पठण हे रामबाण उपाय आहे. पण हनुमान चालीसा वाचण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत असते, ज्यामुळे तिचा प्रभाव अधिक वेगाने जाणवतो. आज 3 जानेवारी 2026, वर्षाचा पहिला शनिवार असल्याने या दिवशी हनुमानाची उपासना केल्याने वर्षभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
पठणाची सर्वोत्तम वेळ: शनिवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर हनुमान चालीसा वाचणे सर्वात प्रभावी मानले जाते. विशेषतः संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
किती वेळा पाठ करावा? संकट निवारणासाठी किमान 3 वेळा पाठ करावा. जर तुम्हाला विशेष कामात यश हवे असेल किंवा भीती वाटत असेल, तर 7 वेळा पाठ करणे शुभ असते. शनीचा त्रास कमी करण्यासाठी 11 किंवा 21 वेळा पाठ करणे अत्यंत प्रभावी मानले जाते.
advertisement
पूजेची योग्य पद्धत: हनुमान चालीसा वाचण्यापूर्वी हनुमानासमोर चौरंगावर लाल कापड अंथरून मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा. समोर शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. बसण्यासाठी लोकरीचे किंवा कुशाचे आसन वापरावे.
शनी दोषापासून मुक्ती: असे मानले जाते की, हनुमानाने शनिदेवाला संकटातून सोडवले होते, तेव्हा शनिदेवांनी वचन दिले होते की जो हनुमानाची भक्ती करेल त्याला मी त्रास देणार नाही. म्हणूनच शनिवारी चालीसा वाचल्याने साडेसातीचा त्रास कमी होतो.
advertisement
मानसिक आणि शारीरिक लाभ: हनुमान चालीसा वाचल्याने मनातील भीती, तणाव आणि भीतीदायक स्वप्ने पडणे बंद होते. मुलांच्या एकाग्रतेसाठी आणि अभ्यासातील प्रगतीसाठी दर शनिवारी सामूहिक चालीसा पठण करणे लाभदायक ठरते.
महत्त्वाचा नियम: पाठ पूर्ण झाल्यानंतर हनुमानाला गूळ-फुटाणे किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. पाठ करताना मन शांत ठेवावे आणि कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नये. लक्षात ठेवा, हनुमानाची भक्ती करताना ब्रह्मचर्याचे पालन आणि सात्विक आहार घेणे अनिवार्य आहे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 12:28 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
शनिवारी हनुमान चालीसा कधी आणि किती वेळा पठण करावी? योग्य फायद्यासाठी जाणून घ्या उत्तर










