अद्भुत मंदिर जिथं प्रभू श्रीरामाने केली होती शिवलिंगाची स्थापना, भाविकांच्या मनोकामना होतात पूर्ण

Last Updated:

भगवान श्रीरामांनी स्थापित केलेले विशाल शिवलिंगाचे विशेष महत्त्व आहे. मंदिराचे पुजारी गोस्वामी महामृत्युंजय गिरी यांनी याबाबत माहिती दिली.

रामेश्वर महादेव मंदिर
रामेश्वर महादेव मंदिर
मंगला तिवारी, प्रतिनिधी
मिर्झापूर : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमाला भव्य आणि दिव्य बनवण्यासाठी जोरदार तयार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भव्यदिव्य सोहळ्याचे यजमान आहेत. जसजशी प्रतिष्ठापना सोहळ्याची तारीख जवळ येत आहे, तसतसा उत्साह वाढत आहे.
मात्र, यासोबतच भगवान रामाचे मिर्झापूरशीसुद्धा एक विशेष कनेक्शन आहे. आज आम्ही तुम्हाला उत्तरप्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिराबाबत जाणून घेऊयात. या मंदिराचा इतिहास हा रामायणकाळाशी जोडला गेला आहे.
advertisement
मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्य क्षेत्रात आपल्या महात्म्यासाठी सुविख्यात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे येतात. श्रद्धा आणि श्रद्धा असलेल्या लोकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते. विंध्य टेकड्यांवर वसलेला, आदिगंगेच्या पवित्र किनाऱ्याला लागून असलेला विंध्य प्रदेश ऐतिहासिक दृष्टिकोनातून समृद्ध असण्यासोबतच त्याचे धार्मिक महत्त्व देखील आहे.
विंध्यवासिनी धामपासून दोन किलोमीटर अंतरावर शिवपूर परिसरात रामगया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामेश्वरम मंदिर आहे. प्राचीन लोकमान्यतेनुसार, त्रेतायुगातील रामगया घाटावर श्राद्ध केल्यानंतर भगवान श्रीरामांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. हे ठिकाण पुढे रामेश्वरम महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
दुकानाबाहेर लिंबू-मिरची का लटकवतात? हे आहे यामागचे महत्त्वाचे कारण...
हे मंदिर मुघल आक्रमकांच्या विध्वंसाचे बळी ठरले आहे. मुघल शासक औरंगजेबाने हे मंदिर नष्ट केले. त्यानंतर उर्वरित दगडांनी पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होते -
भगवान श्रीरामांनी स्थापित केलेले विशाल शिवलिंगाचे विशेष महत्त्व आहे. मंदिराचे पुजारी गोस्वामी महामृत्युंजय गिरी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भगवान शिव त्रिकोणाच्या मध्यभागी स्थित आहेत. भगवान शंकराच्या तीन डोळ्यांसमोर तीन महादेवी आहेत. पूर्वेला महालक्ष्मी, दक्षिणेला काली आणि पश्चिमेला माँ सरस्वती विराजमान आहेत. भगवान शंकराच्या दरबारात भक्त जी काही इच्छा व्यक्त करतात, त्यांची ती मनोकामना पूर्ण होते, असेही त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
अद्भुत मंदिर जिथं प्रभू श्रीरामाने केली होती शिवलिंगाची स्थापना, भाविकांच्या मनोकामना होतात पूर्ण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement