कर्माचं फळ इथेच मिळणार, पोटची मुलंच देणार गुन्ह्यांची शिक्षा, काय आहे पुनर्जन्माचं गणित?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
हिंदु धर्मशास्त्रांनुसार, पुनर्जन्म होतो. मागच्या जन्मात आपण केलेल्या कर्मांच्या आधारे आई-वडील, भाई-बहीण, पती-पत्नी, प्रेमिका, मित्र अशी नाती मिळतात.
माणूस जसं कर्म करतो, तशीच फळं मिळतात असं म्हणतात. एखाद्याचा मुलगा चांगला नसेल तर त्याने मागच्या जन्मात चांगली कर्म केली नसतील, असं म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. मागचा जन्म आणि पुनर्जन्म या गोष्टी असतात का, त्याचे कसे परिणाम कोणत्या नात्यांवर होतात ते जाणून घेऊया.
हिंदु धर्मशास्त्रांनुसार, पुनर्जन्म होतो. मागच्या जन्मात आपण केलेल्या कर्मांच्या आधारे आई-वडील, भाई-बहीण, पती-पत्नी, प्रेमिका, मित्र अशी नाती मिळतात.
पुनर्जन्माचा मागच्या जन्माशी संबंध
ऋणानुबंध
अयोध्या दर्शन एक्स हँडलने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या जन्मात एखाद्या जीवाचं तुमच्यावर ऋण असेल किंवा तुम्ही त्याचं नुकसान केलं असेल तर तो तुमच्या घरी जन्म घेईल व तुमचे पैसे खर्च करेल किंवा त्याचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत तो त्रास देईल.
advertisement
शत्रू पुत्र
मागच्या जन्मीचं कोणी तुमच्याशी बदला घेण्यासाठी तुमचा पुत्र बनून येईल. तो पालकांशी भांडेल, मारहाण करेल, त्रास देईल. कडवट बोलून अपमान करेल आणि सर्वांना दुःख देऊन खूश राहील.
उदासीन पुत्र
या प्रकारची मुलं पालकांची सेवा करत नाहीत, त्यांना मुलाचं सुख देत नाहीत आणि त्यांना सोडून देतात. अशी मुलं पालकांपासून वेगळी होतात.
advertisement
★ कर्म का खाता ★
संतान के रूप में कौन आती है❓
पूर्व जन्म के कर्मों से ही हमें इस जन्म में माता-पिता, भाई-बहन, पति-पत्नि, प्रेमिका, मित्र-शत्रु, सगे-सम्बंधी इत्यादि संसार के जितने भी रिश्ते-नाते हैं सब मिलते है।
क्योंकि इन सबको हमें या तो कुछ देना होता है, या इनसे कुछ लेना… pic.twitter.com/0iiGpEaDe4
— Ayodhya Darshan (@ShriAyodhya_) November 18, 2024
advertisement
सेवक पुत्र
मागच्या जन्मात तुम्ही कोणाची खूप सेवा केली असेल तर त्याचं ऋण फेडण्यासाठी ती व्यक्ती तुमचा मुलगा किंवा मुलगी बनून येते. तुम्ही मागच्या जन्मात पालकांची सेवा केली असेल तर तुमची मुलं तुमची सेवा करतील.
कोणीही मूल बनून येऊ शकतं
हा नियम फक्त माणसांना लागू होतो असं नाही. तुम्ही गाईची सेवा केली असेल तर ती मुलगा किंवा मुलगी बनून पुढच्या जन्मी तुमच्या पोटी येऊ शकते. तुम्ही तिला त्रास दिला असेल तर ती मुलगा किंवा मुलगी बनून जन्म घेईल. जर तुम्ही निष्पाप सजीवाला त्रास दिला असेल तर तो तुमचा शत्रू बनून येईल. त्यामुळे कोणाचंही वाईट करू नका. तुम्ही जे कराल तेच तुम्हाला या किंवा पुढच्या जन्मात फेडावं लागेल हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही कुणाला एक रुपया दिला असेल तर तुम्हाला 100 रुपये मिळतील. तुम्ही कोणाचा एक रुपया घेतला असेल तर 100 रुपये परत फेडावे लागतील.
advertisement
या गोष्टी समजून घ्या
तुम्ही या जगात काय घेऊन आला होता आणि काय घेऊन जाणार, सोनं चांदी कोण मरताना सोबत नेतं?, सगळं इथेच पडून राहतं, त्यामुळे जास्त लोभ नसावा. तुमची मुलं चांगली असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काही सोडून जायची गरज नाही, कारण मेहनतीने ते त्यांच्यासाठी स्वतः कमवतील. तुमची मुलं जर चांगली नसतील, तर तुम्ही कितीही संपत्ती सोडून गेलात तरी ती वाया घालवतील. त्यामुळे जमतील तेवढी चांगली कर्म करा, तीच तुमच्या सोबत जातील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2024 5:36 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
कर्माचं फळ इथेच मिळणार, पोटची मुलंच देणार गुन्ह्यांची शिक्षा, काय आहे पुनर्जन्माचं गणित?