लग्नात मंगलाष्टके किती असावीत? का गायली जातात? पाहा खरं कारण Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांना विशेष महत्त्व दिले गेलेय.
वर्धा, 13 डिसेंबर : मंगलाष्टक हे भारतीय विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा भाग असतो. विवाहकार्यात आशीर्वादपर असे आठ श्लोक म्हटले जातात त्यांनाच 'मंगलाष्टक' असे म्हणतात. लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांना विशेष महत्त्व दिले गेलेय. लग्नाच्या वेळी मंगलाष्टक का म्हटले जातात? मंगलाष्टक नेमके किती आणि कसे असायला हवेत? याबद्दलच वर्धा येथील पं. हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
मंगलाष्टके का म्हणतात?
मंगलाष्टके, लग्नामध्ये वर आणि वधूला परस्पर समोरासमोर उभे करून मंगलाष्टक म्हटले जाते. आता मंगलाष्टक का म्हणतात? तर मंगलाष्टक या करता म्हणतात 'तदेव लग्नं सुदिनं तदेवताराबलं चन्द्रबलं तदेव ।विद्याबलं दैवबलं तदेवलक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥ हा मंत्र म्हणून गुरुजी लग्न लावतात. त्यावेळी वधूवर लक्ष्मीनारायणाचं स्वरूप असतात. उमा महेश्वराचं रूप असतात. गोपाल कृष्णाचं स्वरूप असतात. म्हणून त्यांच्या डोक्यावरती अक्षदा टाकतात. आणि आलेले सगळे पाहुणे अक्षदा टाकतात आणि आशीर्वाद देतात,असं हेमंत शास्त्री पाचखेडे सांगतात.
advertisement
मंगलाष्टके किती असावीत?
मंगलाष्टक म्हणजे आठ मंगलाष्टक म्हणावे. लग्नात फार कमी गुरुजींना या गोष्टी माहिती असतात. बरेच जण पूर्ण म्हणत नाही. केवळ पाच मंगलाष्टक म्हणतात.'तदेव लग्नं सुदिनं तदेवताराबलं चन्द्रबलं तदेव' या शेवटच्या मंगलाष्टका त्यांच्या डोक्यावर पडल्या पाहिजे.
advertisement
मंगलाष्टके कशी आली ?
मंगलाष्टके म्हणण्याच्या विविध बाजू आहेत. जे साहित्यिक लोकं होते,यांनी मराठी वाङ्मयातून साहित्य लिहिलेलेत. जे संस्कृतचे कवी होते त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत. आणि जे महर्षी होते त्यांनी श्रीमद् भागवताचे श्लोकाच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. भागवतात सुद्धा मंगलाष्टके आलेले आहेत. जे श्लोक असतात तेच मंगलाष्टकाच्या स्वरूपात म्हटल्या जातात. गुरुजींनी स्वतः म्हटलेले मंगलाष्टक हे तुमच्या जीवनात यशस्वी ठरतात. गुरुजींना त्याच ज्ञान असतं. म्हणून गुरुजींनी मंत्र त्याला काहीतरी साहित्य असलं पाहिजे,भगवंताचे नामस्मरण असले पाहिजे. असे मंगलाष्टके लग्नात म्हंटल्यास वधू वराचे कल्याण होते, असंही हेमंत शास्त्री पाचखेडे महाराज सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Dec 13, 2023 5:20 PM IST









