चिचुंद्री अन् घुबड करणार तुमचं कल्याण, दिवाळीला दर्शन झालं तर होईल हा फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
चिचुंद्री आणि पांढरी घुबड सामान्यत: दिसतात. मात्र, जर दिवाळीला यांचे दर्शन दुर्लभ असते.
अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
वाराणसी, 5 नोव्हेंबर : दिवाळीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतसा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारातही खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीमातेसह भगवान गणेशाचीही पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, दिवाळीला सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ असते. मात्र, यादिवशी जर तुम्हाला चिचुंद्री आणि पांढरी घुबड दिसली तर तुमच्यावर संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची पूजा होणार आहे, असे समजावे.
advertisement
काशीचे ज्योतिषाचार्य पंडित सजंय उपाध्याय यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. चिचुंद्री आणि पांढरी घुबड सामान्यत: दिसतात. मात्र, जर दिवाळीला यांचे दर्शन दुर्लभ असते. त्यामुळे जर दिवाळी चिचुंद्री आणि पांढरी घुबड दिसली तर तुमच्या आयुष्यात चांगल्या दिवसांची सुरूवात होणार असे मानावे, असे काशी के ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले.
कुबेराचा मिळणार आशीर्वाद -
मान्यतांनुसार, दिवाळीच्या दिवशी चिचुंद्रीच्या दर्शनाने धनदेवता कुबेर प्रसन्न होतात आणि अशा लोकांवर पैशांचा वर्षावर करतात. यासोबतच आयुष्यातील इतर कष्ट आणि संकटही दूर होतात. तसेच चिंताही दूर होतात. तसेच जर पांढरी घुबड बाबत बोलायचे झाल्यास, ही माता लक्ष्मीचे प्रतीक आणि त्यांचे वाहन मानले जाते. माता लक्ष्मी यावर विराजमान असते.
advertisement
दिवाळीला पांढरी घुबडचे दर्शन झाल्याने आयुष्यातील चांगला काळ सुरू होत असल्याचे मानावे. वर्षभर माता लक्ष्मीच्या कृपेचा वर्षाव होत असतो. तसेच घरात सुख शांती नांदते.
(सूचना: ही बातमी धार्मिक मान्यता आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज18 लोकल याबाबत कोणताही दावा करत नाही)
Location :
Varanasi,Uttar Pradesh
First Published :
November 05, 2023 4:11 PM IST