पत्रिकेतल्या 36 गुणांवर नाही, 2 दोषांवर लक्ष देणं गरजेचं! नाहीतर लग्न मोडू शकतं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्र सांगतं की, पत्रिका नाही जुळवल्या तर एखाद्या वेळी संसार टिकूही शकतो पण या 2 दोषांवर उपाय नाही केला तर मात्र संसार टिकण्याची शक्यता फार कमी असते.
ओम प्रयास, प्रतिनिधी
हरिद्वार : अनेकजण लग्नाआधी वधू-वराची पत्रिका पाहतात. दोघांच्या पत्रिकेतले 36 पैकी 30 गुण जुळले तर हा विवाह 7 जन्मांसाठी अतूट मानला जातो. नाहीतर दोघांचे 18 गुण जुळले तरी लग्न करतातच. काहीजण नाडीदोष आणि ग्रहांची स्थितीसुद्धा पाहतात, जेणेकरून दोघांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांना पुढे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.
आता प्रेमविवाह करण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे पत्रिकेतले गुण जुळण्यापेक्षा स्वभावातले गुण आणि विचार जुळणं जास्त महत्त्वाचं मानलं जातं आणि पत्रिका न जुळवताही उत्तम संसार होतात. परंतु सध्या घटस्फोटांचं प्रमाणही वाढलंय हेही तितकंच खरंय.
advertisement
ज्योतिषशास्त्र सांगतं की, पत्रिका नाही जुळवल्या तर एखाद्या वेळी संसार टिकूही शकतो पण नाडीदोष आणि मंगळ दोषावर उपाय केला नाही तर मात्र संसार टिकण्याची शक्यता फार कमी असते. अशा संसारात अडचणींमागून अडचणी येतात. दोघांना सतत कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात.
advertisement
या 2 दोषांवर उपाय करणं आवश्यक!
हरिद्वारचे ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री सांगतात की, जेव्हा लग्न ठरतं, तेव्हा सर्वात आधी वधू-वराची पत्रिका पाहणं गरजेचं आहे. 36 पैकी 36 गुण जुळले तर अतिउत्तम, परंतु जर 36 पैकी 18 पेक्षा कमी गुण जुळले तर ते लग्न टिकत नाही. गुण पाहिल्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे नाडी दोष आणि मंगळ दोष. पत्रिकेत या दोन्ही दोषांचं मिलन होणं आवश्यक आहे. जर असं नाही झालं तर त्यावर वेळीच उपाय करावा जेणेकरून वधू-वराचा संसार अतूट होईल.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Uttar Pradesh
First Published :
June 14, 2024 6:50 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
पत्रिकेतल्या 36 गुणांवर नाही, 2 दोषांवर लक्ष देणं गरजेचं! नाहीतर लग्न मोडू शकतं