कार्तिकी एकादशीला चुकूनही करू नका या गोष्टी, येईल पश्चातापाची वेळ, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कार्तिकी एकादशी निमित्ताने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात इथं पाहा.
धाराशिव, 23 नोव्हेंबर: वारकरी संप्रदायात आषाढी एकादशी इतकंच महत्त्व कार्तिकी एकादशीला आहे. पंढरीत वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. कार्तिकी एकादशी निमित्ताने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे धाराशिव येथील ज्योतिषी मधूसुदन पांडे यांनी सांगितलं आहे.
कार्तिकी एकादशीला चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो. या एकादशीनंतर घरात शुभ कामे केली जातात. पुराणांमध्ये कार्तिकी एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीची जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते असा उल्लेख आढळतो. चातुर्मासात भगवान विष्णू चार महिने निद्रावस्थेत जातात. ते कार्तिकी एकादशीला जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा भार उचलतात. म्हणून कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात, असे महाराज सांगतात.
advertisement
कार्तिक एकादशी निमित्त हे करावे
कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास करावा. भजन, कीर्तन करावे, विठ्ठलाचे नामस्मरण करावेच. गोमातेची सेवा करावी. महिला आणि लहान मोठ्यांचा आदर करावा, असे महाराज सांगतात.
कार्तिक एकादशी निमित्त हे करू नये
कार्तिकी एकादशीला पौराणिक मान्यतेनुसार अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी भांडण करू नये. खोटं बोलू नये. तामसिक भोजन करू नये. ज्येष्ठांचा, श्रेष्ठांचा, लहानांचा आणि स्त्रियांचा आपमान करु नये. कार्तिकी एकादशीच्या दिवशी नखं कापू नये, केस कापू नयेत, असं सांगितलं जातं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 23, 2023 11:02 AM IST