लक्ष्मी होते प्रसन्न! कासवाची अंगठी घालण्याचे 'हे' आहेत अद्भुत फायदे, पण 'या' चुका टाळा!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार कासव अंगठी घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. ही अंगठी...
Tortoise ring benefits : कासवाची अंगठी माणसासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ही अंगठी लोकांच्या आयुष्यात खूप फरक घडवते असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते. पण ती घालण्याचे काही खास नियम आहेत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले जातात.
अंगठी घालण्याचे हे आहेत नियम
हिंदू धर्मानुसार, जे लोक कासवाची अंगठी घालतात, त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. जो व्यक्ती कासवाची अंगठी घालताना नियमांचे पालन करत नाही, त्याला जीवनात नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कासवाची अंगठी घालण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे योग्य राहील.
advertisement
अंगठी घालण्याची दिशी कोणती असावी?
कासवाची अंगठी घालण्यापूर्वी तिची दिशा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कासवाची अंगठी घालताना, तिचा चेहरा आतल्या बाजूला ठेवा. जर एखाद्याने आपल्या बोटात कासवाचा चेहरा बाहेरच्या बाजूला करून अंगठी घातली, तर त्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कासवाची अंगठी रोज स्वच्छ करावी. शौचालयाला जाण्यापूर्वी कासवाची अंगठी काढून ठेवा. कासवाची अंगठी घालून इतर अस्वच्छ ठिकाणी जाऊ नये. यामुळे अडचणी येऊ शकतात.
advertisement
ही अंगठी घालण्याचे काय आहे फायदे
कासवाची अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालावी. कासवाची अंगठीचे अनेक फायदे आहेत. कासवाची अंगठी घातल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. याचबरोबर, ही कासवाची अंगठी घातल्याने कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतात. याव्यतिरिक्त, या अंगठ्या घातल्याने लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता असते.
हे ही वाचा : Vastu tips: घरी पोपट पाळणे शुभ की अशुभ? उज्जैनच्या आचार्यांकडून जाणून घ्या नियम आणि महत्त्व!
advertisement
हे ही वाचा : 10 की 11 जुलै... कधी आहे गुरू पौर्णिमा? अयोध्येच्या ज्योतिषांनी सांगितले पूजा विधी अन् शुभ मुहूर्त!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2025 5:33 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
लक्ष्मी होते प्रसन्न! कासवाची अंगठी घालण्याचे 'हे' आहेत अद्भुत फायदे, पण 'या' चुका टाळा!