Mahabharat : 100 कौरव पण फक्त दुर्योधन, दुशासनच सगळ्यांना माहिती, इतर कौरवांची नावं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
ahabharat Story : महाभारतातील कौरवांची नावं विचारली तर बहुतेकांना फक्त दुर्योधन आणि दुशासन हीच दोन नावं आठवतील. पण त्यांच्या इतर 98 भावांची नावं क्वचितच कोणाला माहिती असतील.
नवी दिल्ली : महाभारतात हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र आणि त्याची पत्नी गांधारी यांना 100 मुलं आणि एक मुलगी होती. त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा दुर्योधन आणि दुसरा मुलगा दुशासन. महाभारतातील पात्रांपैकी कौरव बंधूंमध्ये दुर्योधन आणि दुशासन हे प्रमुख भूमिकेत दिसतात. त्यामुळे दुर्योधन आणि दुशासन यांची नावं सर्वांना आठवतील. पण त्यांचे इतर 98 भाऊ आणि एकुलत्या एक बहिणीबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल.
असं म्हणतात, वेद व्यासांनी गांधारीला 100 पुत्रांची आई होण्याचा आशीर्वाद दिला होता. ती 2 वर्षे गरोदर राहिली. प्रसूतीच्या वेळी तिच्या गर्भातून लोहाचा गोळा बाहेर आला. तो गोळा कापून त्याचे 100 तुकडे करून घागरीत ठेवले. धृतराष्ट्र आणि गांधारी यांना त्यांच्यापासून 100 पुत्र झाले. लोहाच्या गोळ्यातील एक तुकडा शिल्लक होता, ज्यातून त्यांची मुलगी दु:शालाचा जन्म झाला.
advertisement
पण दुर्यौधन, दुशासन यांच्याशिवाय इतर कौरवांची आणि कौरवांच्या बहिणीची नावं काय आहेत ते पाहुयात.
100 कौरवांची नावं
1. दुर्योधन 2. दुशासन 3. दुषय 4. दुशाल 5. जलसंध 6. साम 7. साहा 8. विंद 9. अनुविंद 10. दुर्धुष 11. सुबाहू 12. दुष्प्रदर्शन 13. दुर्दर्शन 14. दुर्मुख 15. दुष्कर्ण 16. कर्ण 17. विविंशती 18. विकर्ण 19. शाला 20. सत्व 21. सुलोचन 22. चित्रा 22. चित्रा 3. चित्र 25. चारु चित्रा
advertisement
26. शरसन 27. दुरमुद 28. दुर्विगह 29. विवित्सू 30. विकतनन 31. ओरनाभा 32. सुनभा 33. नंद 34. उपानंद 35. चित्रबन 36. चित्रवर्मा 37. सुवर्मा 38. दुर्विमोचना 39. अयोबाहू 40. महाबाहू 41. चित्रांग 42. चित्रकुंडल 43. भीमवेग 44. भीमबल 45. बालकी 46. बालवर्धन 47. उग्रयुध 48. सुषेण 49. कुंधधर 50. महोदा
advertisement
51. चित्रयुध 52. निशांकी 53. पाशी 54. वृंदारका 55. धारावर्मा 56. धारक्षेत्र 57. सोमकीर्ती 58. अनुदार 59. दुर्हासंध 60. जरासंध 61. सत्यसंधा 62. साधसुवाक 63. उग्रश्रव 64. उग्रसेन 65. सेनानी 66. रक्तपराजय 67. अपराजित 68. कुंडशाई 69. विशालाक्ष 70. दुर्धर 71. मजबूत हात 72. सुहस्त 73. बटवेग 74. सुवर्ण 75. आदित्य केतू.
advertisement
76. ब्राह्यशी 77. नागदत्त 78. अग्रशायी 79. कवची 80. क्रथन 81. कुंडी 82. उग्र 83. भीमरथ 84. वीरबाहू 85. अलोलूप 86. अभय 87. रौद्रकर्म 88. धारयशहृदय. 90. कुंडभेडी 91. विरवी 92. प्रमथ 93. प्रमयी 94. दिर्घरोमा 95. लांब शस्त्रधारी 96. महाबाहू 97. व्युधोरस्क 98. कनकध्वज 99. कुंडशी 100. विरजा
advertisement
कौरवांची एकुलती एक बहीण
कौरवांची एकुलती एक बहीण जिचं नाव दु:शाला होतं. तिचं लग्न जयद्रथाशी झालं होतं. तो सिंधू राजा वृद्धाक्षत्राचा पुत्र होता, ज्याचा जन्म कित्येक तपश्चर्येनंतर झाला होता. कौरवांचा मेहुणा असल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याने कौरवांच्या बाजूने पांडवांच्या विरोधात युद्ध केलं. जयद्रथला वरदान होतं की त्याला कोणीही मारू शकत नाही. पण कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने त्याचा वध केला. चक्रव्यूहात अभिमन्यूचा मृत्यू जयद्रथमुळे झाल्याचं अर्जुनला समजल्यावर त्याने जयद्रथचा वध केला.
advertisement
Location :
Delhi
First Published :
July 20, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : 100 कौरव पण फक्त दुर्योधन, दुशासनच सगळ्यांना माहिती, इतर कौरवांची नावं काय?