Mahabharat: द्रौपदीच्या शरीरातून यायचा कशाचा सुगंध, ज्याने पांडव व्हायचे दंग? तिच्या सौंदर्याचं काय होतं रहस्य?
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
असं म्हणतात की, द्रौपदी जन्मत:च प्रचंड सुंदर होती. विशेष म्हणजे ती केवळ सौंदर्यानं परिपूर्ण नव्हती, तर तिचे विचारही स्पष्ट होते. वैचारिकदृष्ट्या ती पूर्णपणे सक्षम होती.
मुंबई : महाभारताविषयी आपण विविध कथा ऐकल्या असतील. त्यात द्रौपदीचं नाव प्रामुख्यानं आलं असेल. 5 पांडवांची ही पत्नी. ही द्रौपदी नेमकी होती कशी याबाबत काय सांगितलं जातं हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
महाभारतात राजा द्रुपदची कन्या होती द्रौपदी. तिचं लग्न 5 पांडवांशी झालं होतं. कुंती पुत्र युधिष्ठिर, अर्जुन, भीम आणि माद्री पुत्र नकुल, सहदेव यांची पत्नी होती द्रौपदी. पाचही पांडवांचं इतर स्त्रियांशीही लग्न झालं होतं, जसं की अर्जुनचं सुभद्राशी आणि भीमचं हिडिम्बाशी. परंतु पाचही पांडवांना द्रौपदीविषयी विशेष प्रेम होतं, कारण ती दिसायला अत्यंत सुंदर, आकर्षक होती. शिवाय तिच्या शरीरातून एक निराळाच मनमोहक असा सुगंध दरवळायचा. असं म्हणतात की, सर्व पांडवांनी आयुष्यभर द्रौपदीची साथ दिली आणि स्वर्गात जातानाही केवळ तिलाच सोबत घेऊन गेले. द्रौपदीच्या सौंदर्याबाबत काही खास गोष्टी सांगितल्या जातात.
advertisement
असं म्हणतात की, द्रौपदी जन्मत:च प्रचंड सुंदर होती. विशेष म्हणजे ती केवळ सौंदर्यानं परिपूर्ण नव्हती, तर तिचे विचारही स्पष्ट होते. वैचारिकदृष्ट्या ती पूर्णपणे सक्षम होती.
द्रौपदीचं मूळ नाव होतं 'याज्ञसेनी'. तसंच तिचा रंग सावळा असल्यामुळे तिला 'कृष्णा'देखील म्हणत. द्रौपदीचा रंग एवढा आकर्षक होता की, तिच्या सौंदर्याची भल्याभल्यांना भूरळ पडत असे.
advertisement
विशेष म्हणजे द्रौपदीचा केवळ रंग आणि रूप सुंदर नव्हतं, तर तिच्या शरीरातून एक अत्यंत मोहक असा सुगंध दरवळत असे. हा सुगंध नेमका कसला आहे, याचा अंदाज लावणं कठीणच. परंतु त्यामुळे तिच्या सौंदर्याची शोभा मात्र वाढत असे.
द्रौपदीची त्वचा अतिशय मऊ होती, परंतु तिला राग आल्यावर किंवा युद्धाच्या वेळी तिची त्वचा अतिशय कठोर होत असे. तिचं नाजूक शरीर युद्धाच्या वेळी पूर्णत: कठोर दिसत असे.
advertisement
असं म्हणतात की, द्रौपदीमध्ये पुन्हा कौमार्य प्राप्त करण्याची कला होती. एका पतीकडून दुसऱ्या पतीकडे जाताना ती ही कला वापरत असे, असं म्हटलं जातं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 02, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat: द्रौपदीच्या शरीरातून यायचा कशाचा सुगंध, ज्याने पांडव व्हायचे दंग? तिच्या सौंदर्याचं काय होतं रहस्य?