Mahabharat: शेवटचा श्वास घेताना दुर्योधनानं का दाखवली श्रीकृष्णाला 3 बोटं? काय होता त्याचा अर्थ?
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या जवळ गेले, 'तुला काही बोलायचंय का', असं त्यांनी त्याला विचारलं. त्यावर दुर्योधनानं सांगितलं की...
मुंबई : महाभारतात दुर्योधनाचं नाव आपण ऐकलंच असेल. महाभारताचं युद्ध न लढण्याचे, थांबवण्याचे अनेक प्रस्ताव दुर्योधनाकडे आले होते. परंतु त्यानं शांतीचे सगळे प्रस्ताव फेटाळून लावले. युद्ध ठरल्यानंतरही त्याच्याकडे पांडवांशी बोलून सामंजस्यानं युद्ध रद्द करण्याचाही प्रस्ताव होता. युद्धादरम्यानही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर शांततेत युद्ध थांबवून इतर जीव वाचवण्याची संधीही त्याच्याकडे होती. परंतु हट्टी दुर्योधनाला कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचं नव्हतं, कारण शेवटी विजय हा त्याच्याच सैन्याचा होणार अशा भ्रमात तो होता. परंतु सत्यात मात्र त्याचा पराभव झाला. अखेरचा श्वास घेताना त्यानं भगवान श्रीकृष्णांना 3 बोटं दाखवली. या 3 बोटांचा नेमका काय अर्थ होता?
भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या जवळ गेले, 'तुला काही बोलायचंय का', असं त्यांनी त्याला विचारलं. त्यावर दुर्योधनानं सांगितलं की, त्यानं महाभारताच्या युद्धावेळी 3 चुका केल्या. त्या चुकांमुळेच तो युद्ध जिंकू शकला नाही आणि आज त्याची ही परिस्थिती झाली. जर त्यानं आधीच या चुका जाणल्या असत्या तर आज विजयी झाला असता, असं त्याचं म्हणणं होतं.
advertisement
भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत शांतपणे दुर्योधनाला त्याच्या चुका विचारल्या, त्यावर दुर्योधनानं पहिली चूक सांगितली की, त्यानं नारायणाच्या स्थानी नारायणाच्या सैन्याला निवडलं. जर नारायण कौरवांच्या बाजूनं असते तर निकाल काहीतरी वेगळाच लागला असता, असं तो म्हणाला.
दुर्योधनानं दुसरी चूक अशी सांगितली की, आपल्या आईनं विरोध करूनही तो पानांचं लंगोट घालून त्यांच्यासमोर गेला. जर नग्नावस्थेत गेला असता तर त्याला कोणताही योद्धा पराभूत करू शकला नसता.
advertisement
तिसरी आणि अंतिम चूक ही सांगितली की, त्याचं स्वत:चं युद्धात सर्वात शेवटी जाणं. जर तो आधीच गेला असता, तर काही गोष्टी त्याला आधीच कळल्या असत्या. कदाचित त्याच्या भावंडांचा, मित्रांचा जीव वाचला असता.
भगवान श्रीकृष्णांनी शांतपणे दुर्योधनाचं सारंकाही ऐकून घेतलं. मग ते म्हणाले, 'तुझ्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे तुझं अधर्मी वागणं आणि स्वत:च्याच कुलवधूचं वस्त्रहरण करणं. तू स्वत: तुझ्या कर्मांनी तुझं भाग्य लिहिलंस. श्रीकृष्णांच्या बोलण्याचं तात्पर्य हे होतं की, दुर्योधन त्याच्या 3 चुकांमुळे नाही, तर अधर्मी असल्यामुळे हरला. हे ऐकून दुर्योधनाला आपल्या चुकांचा पश्चात्ताप झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 07, 2025 1:23 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat: शेवटचा श्वास घेताना दुर्योधनानं का दाखवली श्रीकृष्णाला 3 बोटं? काय होता त्याचा अर्थ?