Mahashivaratri 2024: महादेवाच्या पूजेत भांग का अर्पण करतात? अशी आहे आख्यायिका

Last Updated:

Mahashivaratri 2024: अमृत मंथन करताना बाहेर पडलेले विष महादेवाने प्राशन केले होते. यामुळे त्यांना खूप त्रास होऊ लागला, हे पाहून, इतर देवतांनी त्यांना भांग खायला दिला. त्यामुळे त्यांना थंडावा मिळाला. तेव्हापासून भांग महादेवाशी संबंधित आहे.

News18
News18
मुंबई : महादेवाला भांग प्रिय असल्यानं अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचा प्रसाद म्हणून भांग खाल्ला जातो, महादेवाला अर्पण केला जातो. महादेवाला भांग प्रिय असण्याबाबत काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार, एकदा कुटुंबातील तणावामुळे शंकराने घर त्यागले. खूप दूर जात असताना त्यांना तहान लागली, जवळच एक हिरवीगार वनस्पती पाहून त्यांनी त्याची पाने तोडली आणि खाल्ली, त्यामुळे शंकरामध्ये त्वरित ताजेपणा आला. ती भांग वनस्पती होती. तेव्हापासून भांग हा महादेवाचा प्रसाद बनला, असे मानले जाते. आणखी एका कथेनुसार, अमृत मंथन करताना बाहेर पडलेले विष महादेवाने प्राशन केले होते. यामुळे त्यांना खूप त्रास होऊ लागला, हे पाहून, इतर देवतांनी त्यांना भांग खायला दिला. त्यामुळे त्यांना थंडावा मिळाला. तेव्हापासून भांग महादेवाशी संबंधित आहे.
महाशिवरात्री 2024 शुभ मुहूर्त -
माघ कृष्ण चतुर्दशी तिथीचा प्रारंभ: 8 मार्च, 09:57
माघ कृष्ण चतुर्दशी तिथी समाप्ती: 9 मार्च, संध्याकाळी 06:17
सर्वार्थ सिद्धी योग: सकाळी 06:38 ते सकाळी 10:41
श्रवण नक्षत्र: सकाळी 06:38 ते सकाळी 10:41, नंतर धनिष्ठा
महाशिवरात्री पूजा मंत्र -
1. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
advertisement
2. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय।।
3. ओम नम: शिवाय
महाशिवरात्री व्रत आणि पूजा पद्धती -
1. महाशिवरात्रीला ब्रह्म मुहूर्ताच्या 05:01 ते 05:50 दरम्यान स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करून मग महाशिवरात्री व्रत व शिवपूजा करण्याचा संकल्प करावा.
advertisement
2. शुभ मुहूर्तावर शिवमंदिरात किंवा घरात भोलेनाथाची पूजा करावी. भगवान शंकराला पाणी आणि गाईच्या दुधाने अभिषेक करा. नंतर त्यांना अक्षत, चंदन, फुले, माळा, भस्म इत्यादींनी सजवा.
3. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना महादेवाला बेलपत्र, भांग, धतुरा, शमीची पाने, मदार, मध, साखर, मनुका, फळे, धूप, दिवा, सुगंध इत्यादी अर्पण करा. त्यानंतर पार्वतीची पूजा करावी. त्यांना श्रृंगार साहित्य आणि लाल चुनरी अर्पण करावी. दोघांची जोडी एकत्र ठेवावी.
advertisement
4. नंतर भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करा. शिव चालिसा आणि महाशिवरात्री व्रत कथा वाचा. पार्वती चालिसा वाचा. त्यानंतर शंकराची आरती करावी.
5. रात्री जागरण करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून पूजा करावी. आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र इत्यादी दान करा. नंतर पारण करून व्रत पूर्ण करावे. शिवाच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivaratri 2024: महादेवाच्या पूजेत भांग का अर्पण करतात? अशी आहे आख्यायिका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement