Mahashivratri 2024: वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; पूर्वाभिमुख मंदिराची अशी अख्यायिका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahashivratri 2024: देशभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यात प्रत्येक मंदिराचे वेगवेगळे वैशिष्ठ पाहायला मिळते. सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर. पहिली अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत. तर घृष्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे.
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी अविनाश कानडजे : आज 08 मार्च रोजी संपूर्ण देशात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी घृष्णेश्वर हे शेवटचे ज्योतिर्लिंग मंदिर, अशी या मंदिराची ओळख आहे. महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री 12 वाजल्यापासून भक्त दर्शनासाठी मंदिरात येत आहेत. ओम नम शिवाय, महादेवाचा जयोघोष करत भक्तिभावाने दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त करतात. काही भाविक आपला पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी येत असतात.
भगवान शंकराची देशभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यात प्रत्येक मंदिराचे वेगवेगळे वैशिष्ठ पाहायला मिळते. सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर. पहिली अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत. तर घृष्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा घृष्णेश्वर भगवान, असे मानले जाते. देशभरात 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेत नाही, तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येत असतो.
advertisement
दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भक्त दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात भक्तीभावानं दाखल होत आपली मनोकामना व्यक्त करून भगवान शंकराचा जयघोष करतात. यंदा महाशिवरात्रीला शुक्र प्रदोष, शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग, सिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच दिव्य शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी त्यांची पूजा केली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास करून महादेवाची पूजा करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 08, 2024 8:23 AM IST
मराठी बातम्या/औरंगाबाद/
Mahashivratri 2024: वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; पूर्वाभिमुख मंदिराची अशी अख्यायिका