Sankashti Chaturthi 2024: वर्षातील शेवटची मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी! गणेश पूजेचा शुभ मुहूर्त-पूजा विधी

Last Updated:

Sankashti Chaturthi 2024 Date and Time: कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्येही प्रगती होते.

News18
News18
मुंबई : डिसेंबर हा शेवटचा महिना आहे, त्यामुळे या महिन्यातील मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी आणखी खास असेल. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणपतीची पूजा आणि व्रत-उपवास केला जातो. जाणून घेऊया डिसेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी आणि शुभ वेळ जाणून घेऊ.
कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्येही प्रगती होते. जीवनात अनेक समस्या वाढल्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने शुभ फळ मिळते.
संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त -
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होईल आणि गुरुवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी 10:02 वाजता समाप्त होईल. निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे 18 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत साजरे करण्यात येणार आहे.
advertisement
ब्रह्म मुहूर्त- पहाटे 5.19 ते 06.40
विजय मुहूर्त - दुपारी 2:01 ते 2:42 पर्यंत
संध्याकाळची शुभ वेळ - 5:25 ते 5:52 पर्यंत
अमृतकाल- सकाळी 06:30 ते 08:07
संकष्ट चतुर्थी पूजा विधी -
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
advertisement
गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. मूर्तीला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा.
कुंकू, हळद-चंदन, माळा, फुलांनी सजवा.
तुपाचा दिवा लावून मोदक व नैवेद्य अर्पण करावेत.
ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा आणि श्रीगणेशाची आरती करा.
संकष्ट चतुर्थीचे महत्त्व - श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हणतात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत पाळल्याने घरात सुख-समृद्धी येते. आर्थिक लाभामुळे व्यवसाय वाढेल. श्रीगणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Sankashti Chaturthi 2024: वर्षातील शेवटची मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी! गणेश पूजेचा शुभ मुहूर्त-पूजा विधी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement