advertisement

पंढरपूर वारी : परंपरेची ओळख आणि नव्या पिढीसाठी एक अनोखी दिंडी “ai-Dindi”

Last Updated:

आषाढी वारीसाठी 18 वर्षांपूर्वी सुरू झालेली आयटी दिंडी आता ai-दिंडी नावाने सर्वसमावेशक बनली आहे. विविध भाषा, प्रांत, वय आणि व्यवसायातील लोकांना सामावून घेणारी ही दिंडी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते.

News18
News18
जून महिना जवळ यायला लागला की वेध लागतात ते आषाढी पायी वारीचे! वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, तर ती एक आत्मिक शुद्धीची प्रक्रिया आहे. वारी आपल्याला साधेपणा शिकवते, त्याग शिकवते. कोणताही भेदाभेद न करता मनःशांती व समाधान कसे मिळवावे हे शिकवते.
याच वारकरी परंपरेत नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक दिंडीची एक अभिनव संकल्पना 18 वर्षांपूर्वी उदयास आली. आयटी दिंडी ह्या नावाने पालखीसोहळ्यात सहभागी होत असतांना काही मर्यादा लक्षात आल्या, वारंवार काही शंकांचे निरसन करावे लागले उदा. अनेकांना वाटते की फक्त आयटी क्षेत्रातलेच लोक सहभागी होऊ शकतात का? घरातल्या अन्य व्यक्ती चालतील का? मी गृहिणी आहे अथवा निवृत्त आहे, मला सहभागी होता येईल का इ.
advertisement
आळंदी ते पुणे ह्या टप्प्यात पूर्वीप्रमाणेच आयटी दिंडी ह्या नावाने व्यवस्था कार्यरत राहील, पण वारीच्या पुणे ते पंढरपूर ह्या पुढील टप्प्यांसाठी आमच्या व्यवस्थेचा विस्तार करतांना आम्ही ai-दिंडी ह्या नावाने सेवा द्यायचे ठरवले.
त्यामागची भूमिका:
-All Inclusive Dindi: विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी/व्यवसायातील लोकांना सामावून घेणारी सर्वसमावेशक दिंडी
-Artificial Intelligence चा वापर: व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
advertisement
-Adhyatmik Intelligence – नव्या पिढीत अध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा एक प्रयत्न
-ai म्हणजे मराठीत ‘आई’ म्हणजे ‘माऊली’, भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती!!! वारीमध्ये सर्वजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात, कारण साऱ्यांमध्ये पांडुरंगाचं प्रतिबिंब पाहिलं जातं.
विज्ञानाच्या प्रगतीचे निदर्शक अशी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भागवत संप्रदायाची अध्यात्मिक शक्ती अश्या दोहोंचा संगम असणारे “ai-दिंडी” हे नाव सर्वार्थाने समर्पक वाटते. ai-Dindi ही नफा नसलेली (Non-profit) संस्था असून ती विविध कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या अथवा व्यावसायिक असणाऱ्या व्यक्तींद्वारा सेवाभावी वृत्तीने चालवली जाते.
advertisement
आमचा उद्देश आहे – अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे.
वारी करण्याची अनेकांची इच्छा असते, पण –
* कुठून सुरुवात करावी? संपूर्ण वारी करणे जमणार नाही, पण अनुभव तर घ्यायचा आहे.
* राहणे, जेवण, परतीची व्यवस्था कशी करावी? सोबत मिळेल का?
advertisement
अशा प्रश्नांमुळे अनेकजण सहभागी होऊ शकत नाहीत. ai-Dindi याच अडचणी सोडवते.
ai-Dindi काय करते?
लोकांना सोयीच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही टप्प्यात सहभागी होता येईल अशी खास व्यवस्था विकसित केली आहे.
-ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही बसची व्यवस्था करतो. उदाहरणार्थ, शनिवारी तुम्हाला वेळ आहे आणि पालखी जेजुरी ते वाल्हे या टप्प्यात आहे, तर आम्ही स्वारगेटहून जेजुरीसाठी बस ठेवतो. त्या टप्प्याची वारी केली की संध्याकाळी परत पुण्यात आणतो.
advertisement
-वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत, टाळ वाजवता यावा, पाऊले खेळता यावेत यासाठी ai दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे “भजनसंध्या आणि वारीतील खेळ” आयोजित करते.
-प्रत्येक टप्प्यासाठी नाममात्र सेवाशुल्क आकारले जाते – त्यामध्ये बस सेवा (पुण्यापासून पुण्यापर्यंत), पाण्याच्या बाटल्या, नाश्ता, जेवण व AI-Dindi नावाची टोपी दिली जाते.
-सलग काही दिवस वारी करायची असल्यास राहण्याचीही व्यवस्था केली जाते.
advertisement
-संपूर्ण वारी (आळंदी ते पंढरपूर) करायची असल्यास त्याचीही आखणी आणि मदत केली जाते.
आल्हाददायक वातावरणात टाळ-मृदुंगाच्या साथीने अभंग गात, नामाच्या गजरात वारकऱ्यासमवेत आनंदात नाचत वारीची अनुभूती घेऊया. चला, एक तरी वारी अनुभवूया!
वारी २० जुन ते ५ जुलै - २०२५ पर्यंत आहे
नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी भेट द्या: www.aidindi.org
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
पंढरपूर वारी : परंपरेची ओळख आणि नव्या पिढीसाठी एक अनोखी दिंडी “ai-Dindi”
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement