नवरात्रीत घटाला फुलांची माळ का वाहतात? कशी सुरू झाली परंपरा?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र घटस्थापना झालीय. या घटाला फुलांची माळ वाहण्याची परंपरा कशी सुरू झाली माहितीये का?
वर्धा, 15 ऑक्टोबर: नवरात्रीला घटस्थापना झाल्यावर नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. काहीजण रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळ घटाला अर्पण करतात. यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? आणि ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली असेल ? हे प्रश्न अनेकांना पडत असतील. याबाबतच वर्धा येथील हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
घटावर माळ वाहणे म्हणजे फक्त कुळाचार
"घटस्थापना झाल्यावर घरोघरी वेगवेगळ्या पद्धती माळ वाहताना बघायला मिळतात. त्यामुळे नवरात्रीत घटावर फुलांच्या माळा अर्पण करणे हा फक्त एक कुळाचर आहे. आपल्या घरच्या ज्येष्ठांनी आपल्याला सांगितले आणि त्या परंपरेने त्या रीती रिवाजाने आपण दरवर्षी घटाला वाहत जातो. अशा प्रकारे ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे कुठलंही शास्त्रीय कारण नाही," असे हेमंत शास्त्री पाचखेडे सांगतात.
advertisement
फुलांच्या माळांमागे काहीही शास्त्रीय आधार नाही
"फुलांची माळ घटावर वाहिली जाते यामागे कुठलंही शास्त्रीय कारण नाही. फक्त फुल वाहण्याचं आवाहन केलं गेलंय. मात्र देवीला फुल किंवा फुलमाळा अर्पण करत असताना मन प्रसन्न, श्रद्धा, भावना आणि भक्तीभाव असावा, असं पाचखेडे महाराज सांगतात.
advertisement
'घट' म्हणजे 'देह' आणि 'दिवा' म्हणजे 'प्राणज्योत'
घट म्हणजे आपला देह आणि अखंड दिवा म्हणजे प्राणज्योत आहे. त्यामुळे ती प्राणज्योत तेवत ठेवा. ती प्राणज्योत तेलाने तेवत राहील आणि आपलं शरीर एनर्जीने म्हणजेच शक्तीने तेवत राहील. त्यासाठी प्रयत्न करा. नवरात्रीत नऊ दिवस शक्तीची उपासना म्हणजे आईची उपासना असल्याचे महाराज सांगतात.
advertisement
माळांचे दिसतात वेगवेगळे प्रकार
"आपल्या घरी चालत आलेल्या परंपरेनुसारच फुलांची माळ घटावर वाहिली जाते. सुरुवातीला जेव्हा सुई अस्तित्वात नव्हती तेव्हा हार किंवा गजरा हा धाग्याला गुंफून तयार केला जायचा. आता देखील देवीला वेणी ही धाग्यांमध्ये विशिष्ट पद्धतीने गुंफूनच बनवली जाते. तर माळ म्हटल्यावर गुंफणे महत्त्वाचे आहे. माळ तयार करताना त्यात विशिष्ट रंगांची फुले असायला हवीत, असेही काही नाही. निसर्गाने जे फुल दिले आहे आणि जे तुमच्याकडे उपलब्ध आहे, ते फुल तुम्ही देवीला अर्पण केलं तरीही चालेल" असे हेमंतशास्त्री सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 16, 2023 9:31 AM IST