नवरात्रीत चारच दिवस होते दुर्गा पूजा, नागपुरातील बंगाली बांधवाची अनोखी परंपरा, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
बंगाली समाजानं दुर्गा पुजेची अनोखी परंपरा जपली आहे. नागपुरात मोठ्या उत्साहात हे दुर्गा पूजन होते.
नागपूर, 21 ऑक्टोबर: अश्विन शारदीय नवरात्र उत्सवाला सर्वत्र मोठ्या उत्सहात सुरुवात झाली आहे. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनचं सर्वच देवींची मंदिरे, दुर्गा उत्सव मंडळ, गरब्यांची मैदाने भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. सर्वत्र या उत्सवाची रेलचेल असताना नागपुरात मात्र बंगाली समाज बांधवांच्या वतीने वेगळ्याच पद्धतीने दुर्गा उत्सव साजरा केला जातो आहे. नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवसाला म्हणजेच षष्ठीला दुर्गा देवी विराजमान होत असते. गेल्या 44 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा नागपुरातील बंगाली समाज बांधवांच्या वतीने मोठ्या अभिमानाने जपली आहे.
षष्ठीला होते देवी विराजमान
नागपुरात गेल्या 44 वर्षांपासून नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवसाला दुर्गा देवी विराजमान होत असते. हा दुर्गा उत्सव चार दिवस चालत असतो. षष्ठीला देवी विराजमान होते. त्यानंतर सप्तमी, महाष्टमी, महानवमी आणि दशमीला देवीचे विसर्जन केल्या जाते. या दरम्यानच्या काळात अनेक उत्सव आणि परंपरेला अनुसरून कार्यक्रम होत असतात. मूर्ती ही बंगाली धाटणीची असून गणेश, कार्तिक, लक्ष्मी, सरस्वती या देवीचा देखील समावेश असतो, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी चंडीचरण पाईन यांनी दिली.
advertisement
ही आहेत मूर्तीची वैशिष्ट्ये
मंडपात विराजमान दुर्गादेवी ही पूर्णतः बंगाली पद्धतीची असून बंगाल येथून वाहणाऱ्या गंगा नदीच्या माती पासून तयार करण्यात आली आहे. मूर्ती ही इतर मूर्ती प्रमाणे अष्टभुजा नसून ती दशभुजा असलेली आहे. देवीच्या प्रत्येक हातात शस्त्र असून आमचे असे मानने आहे की, महिषासुराचा वध करण्यासाठी देव देवतांनी माधुरीला एक एक शस्त्र प्रदान केले आहे, असे मंडळाचे अध्यक्ष एस. एस. गुचाईत सांगतात.
advertisement
नवरात्र उत्सवात देवी आपल्या कुटुंबासोबत सासर वरून माहेरी येते. नवरात्रीच्या या दैनंदिन दुर्गा पूजा मध्ये बंगाली समाज बांधवांसह समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होत असतात. महिलांच्या वतीने उपवास ठेवण्यात येत असतो. दररोज पूजा विधी करून प्रसाद वितरित करण्यात येतो. दररोज खिचडी भोग देवीला देण्यात येतं असतो. तर जवळ जवळ 2000 लोकांना हा प्रसाद वितरित करण्यात येतो. दशमीच्या दिवशी दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात येते. देवीला शेंदूर, मिठाई, हळदी कुंकू कार्यक्रम आदी करत देवीची विदाई करण्यात येत असते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष एस.एस गुचाईत यांनी दिली.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 21, 2023 9:26 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीत चारच दिवस होते दुर्गा पूजा, नागपुरातील बंगाली बांधवाची अनोखी परंपरा, Video