PHOTOS: तुळजाभवानीला तब्बल 10 किलो सोन्याचा साज अर्पण; शिवकालीन मोहरांचाही समावेश
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tuljabhavani News: तुळजाभवानी मातेस अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये 7.41 कोटींच्या 10 किलो सोन्याच्या अलंकारांचा साज, शिवरायांनी देवीला दान केलेल्या मोहरा व मणीठशांचा समावेश आहे.
धाराशिव : (प्रतिनिधी, बालाजी निरफळ) सध्या नवरात्र-दसरा उत्सवामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण आहे. देवींच्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी आहे. तुळजापूरच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. श्री तुळजाभवानी देवीची अष्टमीला भवानी तलवार पूजा मांडण्यात आली.
या पूजेवेळी तुळजाभवानी देवीच्या अंगावर 9 किलो 883 ग्रॅम वजनाच्या ऐतिहासिक आणि मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांचा साज चढवण्यात आला. त्याची किंमत तब्बल सात कोटी 41 लाख रुपये आहे. या दागिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस दान केलेल्या 101 मोहरा व 103 मणीठशांच्या 564.280 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या माळेचा समावेश आहे.
advertisement
याशिवाय पुतळ्याची माळ (845.590 ग्रॅम), सोन्याची हरफर रेवड्यांची माळ (806.310 ग्रॅम), पायजोड (670.500 ग्रॅम), मुकुट कळसासह (460.100 ग्रॅम), सोन्याचा सूर्यहार (321.900 ग्रॅम), कानजोड जडावी मोत्यासह (277.910 ग्रॅम) व मोतीसह माणकाचे पदक (240 ग्रॅम) यासह इतर मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2024 9:48 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
PHOTOS: तुळजाभवानीला तब्बल 10 किलो सोन्याचा साज अर्पण; शिवकालीन मोहरांचाही समावेश