Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारीला, 2026 सालातील पहिली पौर्णिमा कधी? धार्मिक महत्त्व, विधी, मुहूर्त-दान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Paush Purnima 2026: हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत, स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णूंची पूजा करणं आणि गरजू लोकांना दान देणं फार शुभ मानलं जातं.
मुंबई : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे. वर्ष 2026 मधली पहिली पौर्णिमा पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येते. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांनी परिपूर्ण असतो, असं मानलं जातं. पौष पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करणं, दानधर्म करणं आणि सूर्यदेवाला अर्घ्य देणं फार पुण्याचं मानलं जातं. शास्त्रांनुसार, पौष महिन्यात केलेल्या सर्व धार्मिक विधींची पूर्णता पौर्णिमेच्या स्नानानंतरच होते. याच दिवशी प्रयागराजमध्ये प्रसिद्ध माघ मेळ्यालाही सुरुवात होते.
पौष पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व -
हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत, स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णूंची पूजा करणं आणि गरजू लोकांना दान देणं फार शुभ मानलं जातं. यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. पौष पौर्णिमेचं व्रत केल्याने मनाला शांती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद लाभतो, असंही सांगितलं जातं.
advertisement
पौष पौर्णिमेपासून माघ स्नानाची सुरुवात होते. या दिवसापासून साधू-संत आणि भाविक कल्पवासाला बसतात. कल्पवास म्हणजे उत्तरेतील प्रयागराजच्या संगमावर एक महिना राहून साधना करणं. या काळात भाविक दररोज तीन वेळा संगमात स्नान करतात. असं मानलं जातं की पौष पौर्णिमेला केलेलं स्नान आणि दान हे वर्षभर केलेल्या पुण्यकर्माइतकं फलदायी ठरतं. या स्नानामुळे माणूस जन्म-मरणाच्या बंधनातून मुक्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
पौष पौर्णिमा 2026 तिथी आणि वेळ -
हिंदू पंचांगानुसार, पौष पौर्णिमा तिथीची सुरुवात 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी होईल. तिथीची समाप्ती 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी होईल. उदय तिथीनुसार, पौष पौर्णिमेचे व्रत 3 जानेवारी 2026, शनिवार या दिवशी ठेवणं योग्य मानलं जातं. या दिवशी चंद्राचा उदय संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी होईल.
advertisement
स्नान आणि दानासाठी शुभ वेळ -
पौष पौर्णिमेला स्नान आणि दानासाठी ब्रह्म मुहूर्त 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5 वाजून 25 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय दुपारी 12 वाजून 05 मिनिटांपासून 12 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणाऱ्या अभिजित मुहूर्तातही दानधर्म करता येईल.
पूजा कशी करावी -
सकाळी पवित्र नदीत किंवा घरी स्नान करून व्रताचा संकल्प करावा. सूर्यदेवाला जल अर्पण करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले, भोग, चंदन, अक्षत आणि तुळस अर्पण करावी. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं आणि ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गाईच्या तुपाचा दिवा लावून आरती करावी. रात्री चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना करावी.
advertisement
या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात -
पौष पौर्णिमेला दान केल्याने ग्रहदोष आणि नकारात्मक प्रभाव कमी होतात, असं मानलं जातं. या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करणं विशेष शुभ मानलं जातं, जसं दूध, तांदूळ, साखर, चांदी, पांढरे कपडे आणि पांढरं चंदन. थंडीचा काळ असल्यामुळे ब्लँकेट, गरम कपडे, तीळ, गूळ, तूप आणि अन्नाचं दान करणं फार पुण्याचं मानलं जातं. खीर प्रसाद म्हणून वाटल्यासही विशेष पुण्य मिळतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारीला, 2026 सालातील पहिली पौर्णिमा कधी? धार्मिक महत्त्व, विधी, मुहूर्त-दान








